व्यावसायिकांवर प्राणघातक हल्ला

केसुर्डी येथील घटना, तिघे जखमी

शिरवळ – केसुर्डी, ता. खंडाळा याठिकाणी लोखंडी हत्याराने व्यावसायिकावर पाच ते सहा जणांनी हल्ला केला. यामध्ये व्यावसायिकासह तिघे जखमी झाले आहेत. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, केसुर्डी, ता. खंडाळा याठिकाणी महामार्गालगत व्यावसायिक रविंद्र अमृत ढमाळ हे सुनील ढमाळ, भाचा रोशन थोपटे, ऋषिकेश यादव बोलत बसले होते.

यादरम्यान, त्याठिकाणी तीन मोटारसायकलवरून पाच ते सहा युवक आले. यावेळी संबंधितांनी अचानकपणे शिवीगाळ दमदाटी करून रवींद्र ढमाळ यांच्यावर लोखंडी हत्याराने हल्ला करत जखमी केले. त्रषीकेश यादव यांच्यावरही स्प्रे हल्ला करत लोखंडी हत्याराच्या बोथट बाजूने हल्ला करत जखमी केले. हल्ल्यामध्ये रविंद्र ढमाळ जखमी तर रोशन थोपटे, ऋषीकेश यादव किरकोळ जखमी झाले आहे. याबाबतची फिर्याद रविंद्र ढमाळ यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून तपास हवालदार आप्पा कोलवडकर करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.