पुणे जिल्हा | प्रा.सचिन थोरवे, स्वाती थोरवे ज्ञान सेवारत्न पुरस्काराने सन्मानित

आळंदी, (वार्ताहर) – येथील इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या माध्यमातून भारतचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकदिनी आळंदी व परिसरात संगणकीय शिक्षण देणारी मल्टी-टेक इंस्टिट्यूटला 25 वषेर्र् पूर्ण झाल्याबद्दल मल्टी-टेक इंस्टिट्यूटचे संचालक प्रा. सचिन थोरवे व प्रा. स्वाती थोरवे यांना ज्ञान सेवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार वेदांतचार्य डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते व पुणे जिल्हा शिक्षण मंडाळाचे मा.संचालक खंडेराव निकम यांच्या अध्यक्षतेखाली वितरित करण्यात आला.
यावेळी विठ्ठलराव शिंदे, डॉ. सुनील वाघमारे, शिरीषकुमार कारेकर, अरुण बडगुजर, जनार्दन पितळे, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, दादासाहेब करांडे, अनिल जोगदंड, राजेश दिवटे,
विठ्ठल महाराज गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. नारायण महाराज जाधव म्हणाले की, अलंकापुरीला ज्ञानाची दीर्घ परंपरा लाभली आहे आणि ही परंपरा वर्धिष्णू आहे.

