प्रा. हरी नरके यांच्या निधनाने मूळ गाव कासारीवर पसरली शोककळा

तळेगाव ढमढेरे – कासारी (ता. शिरूर) हे मूळ गाव असणाऱ्या ज्येष्ठ विचारवंत समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे मुंबई येथे निधन झाल्याचे वृत्त समजताच कासारी परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
प्रा. हरी नरके हे पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन होते. महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशनात व ते साहित्य घराघरात पोहोचविण्यात प्रा. हरी नरके यांचे महत्वाचे योगदान होते. कासारी -तळेगाव ढमढेरेमधील आपल्या सहकाऱ्यांना भेटता यावे तसेच ग्रामीण भागातील नवयुवकांना आधुनिक विचारांची भर पडावी यासाठी आपल्या गावी तळेगाव ढमढेरे येथे आईच्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षी सोनाई व्याख्यानमालेचे आयोजन करीत असत.
त्यांच्या निधनाने तळेगाव ढमढेरे -कासारी गावावर शोककळा पसरली आहे. पुणे येथे अंत्यविधीसाठी तळेगाव ढमढेरे व कासारी येथून मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.


