मुंबई – ईडीने बुधवारी बॉलीवूड चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा विरोधात 31.6 कोटी रुपयांचा फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तिला बुधवारी समन्स बजावण्यात आले होते, मात्र ती ईडीसमोर हजर झाली नाही. प्रेरणा या दिवसांत काही महत्वाच्या कामासाठी बाहेर गेली आहे. प्रेरणाने त्यांचे वकील विवेक वासवानी यांच्यामार्फत वेळ मागितली होती. प्रेरणाने अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती केली आहे. तिने अक्षय कुमार, सलमान खान आणि जॉन अब्राहम यांसारख्या बड्या स्टार्सच्या चित्रपटांची निर्मितीही केली आहे.
प्रेरणा अरोरावर बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंत खूप टीका होत आहे. काम करताना पारदर्शकता आणि थकबाकी यावरून तिला अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले. गेल्या वर्षी वासू भगनानी यांनी प्रेरणाविरोधात गुन्हा दाखल केला होता. ‘पॅडमॅन’ आणि ‘केदारनाथ’च्या राइट्समधून माघार घेतल्याने प्रेरणामुळे आपले 31.6 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप त्याने केला होता.
ED registers a money laundering case against Bollywood producer Prerna Arora
— ANI (@ANI) July 20, 2022
प्रेरणा अरोरा ‘केदारनाथ’, ‘टॉयलेट – एक प्रेम कथा’, ‘पॅडमॅन’, ‘फन्ने खान’, ‘परी’ यांसारख्या चित्रपटांच्या निर्मात्या आहेत. तसेच अभिनव बिंद्रावर बायोपिक बनवण्यातही त्यांचा सहभाग होता.कामातून दीर्घ विश्रांती घेतल्यानंतर, प्रेरणा अरोरा यांनी सप्टेंबर 2020 मध्ये तिच्या पुढील प्रोजेक्टसची घोषणा केली.ज्यात विवेक ओबेरॉय आणि श्वेता तिवारी यांची मुलगी पलक तिवारी पदार्पण करणार आहे. परंतु चुकीच्या मॅनेजमेंटमुळे विवेक प्रोजेक्टमधून बाहेर पडला.