प्रियांकाने वडिलांसोबतचा तो फोटो केला शेअर, लिहिली भावूक पोस्ट; म्हणाली “पापा तुमची दररोज आठवण येते”

Bollywood actress Priyanka Chopra : बॅालीवडूची देसी गर्ल प्रियांका चोप्राने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. तिने आपल्या वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त आठवण काढत भावनिक पोस्ट लिहिली आहे. १० जून २०१३ रोजी प्रियांकाचे वडील डॅा. अशोक चोप्रा यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. अभिनेत्रीने वडिलांच्या १२ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्यासोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आठवणी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत असते. अभिनेत्रीचे वडील डॉ. अशोक चोप्रा यांचे १० जून २०१३ रोजी आजारपणामुळे निधन झाले. मंगळवार १० जून रोजी अभिनेत्रीच्या वडिलांची १२ वी पुण्यतिथी होती. या प्रसंगी प्रियांकाने रात्री उशिरा तिच्या वडिलांची आठवण काढत एक जुना फोटो तिच्या इन्स्टाग्रावर शेअर केला आहे. जो तिच्या खूप हृदयस्पर्शी आहे, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
View this post on Instagram
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा वडिलांसोबतचा जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या वडिलांसोबत दिसत आहे. त्यांची आठवण काढत अभिनेत्रीने लिहिले, ‘मला तुमची दररोज आठवण येते, बाबा.’ या फोटोत ती तिच्या वडिलांसोबत बर्फाळ ठिकाणी सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनी लगेचच अभिनेत्री प्रियांका चोप्रा रुपेरी पडद्यावर परतली.
देसी गर्ल प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्ये अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. ती शेवटची २०१९ मध्ये ‘द स्काय इज पिंक’ मध्ये दिसली होती. ती लवकरच अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय ‘क्रिश ४’ मध्येही ती दिसणार आहे. ती सध्या ‘एसएसएमबी २९’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
हेही वाचा: श्रेयाची CID 2 मध्ये एन्ट्री; नेटकऱ्यांनी ‘या’ कारणामुळे व्यक्त केली नाराजी





