Priyanka Gandhi: “काल NDA साठी काळा दिवस होता” ; प्रियंका गांधींची भाजपवर टीका ;”हा महिला आरक्षणाचा नाही तर मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा”
Priyanka Gandhi: महिला आरक्षणावरून संसदेत वाढत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर थेट हल्ला चढवला आहे.

Priyanka Gandhi: महिला आरक्षणावरून संसदेत वाढत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर थेट हल्ला चढवला आहे. त्या म्हणाल्या की, पहिल्यांदाच सरकारला असा धक्का बसला आहे, ज्यामुळे त्यांच्या धोरणांमागील सत्य उघड झाले आहे.
प्रियांका यांनी यावर जोर दिला की, महिलांचे हक्क आता आणखी पुढे ढकलता येणार नाहीत आणि २०२३ मध्ये मंजूर झालेला कायदा तात्काळ लागू झाला पाहिजे.
सरकारला वास्तवाला सामोरे जावे लागेल Priyanka Gandhi:
प्रियांका गांधी यांनी यावेळी बोलताना, “सध्याच्या घडामोडींमुळे हे स्पष्ट झाले आहे की, सरकारची रणनीती आता प्रभावी ठरत नाहीये. हा सरकारसाठी एक मोठा राजकीय धक्का असल्याचे सांगत, त्यांनी ही परिस्थिती त्यांच्याच धोरणांचा परिणाम आहे.” असे म्हणत सरकारवर टीका केली.
महिलांना सर्व काही कळते
पुढे बोलताना प्रियांका गांधी यांनी,”देशातील महिला आता पूर्वीपेक्षा अधिक जागरूक झाल्या आहेत आणि केवळ प्रसिद्धीने त्या प्रभावित होऊ शकत नाहीत. त्यांच्या मते, आज महिलांसमोरील आव्हाने सातत्याने वाढत आहेत आणि त्या प्रत्येक निर्णयावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.”असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बदल निर्णयांतून येईल, देखाव्यातून नाही
प्रियांका गांधी म्हणाल्या की, “केवळ मीडिया व्यवस्थापन किंवा प्रसिद्धीने खरा बदल घडवून आणता येणार नाही. सरकारने ठोस पावले उचलावीत”. त्यासोबतच त्यांनी,”आता निर्णय घेण्याची वेळ आहे, घोषणा करण्याची नाही. संसदेने एकमताने मंजूर केलेला महिला आरक्षण कायदा तात्काळ लागू केला पाहिजे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्याच्या अंमलबजावणीत काही तांत्रिक अडथळे आल्यास, ते किरकोळ दुरुस्त्यांद्वारे दूर केले जाऊ शकतात.
विरोधी पक्ष आणि लोकशाहीचा विजय Priyanka Gandhi:
प्रियांका गांधी म्हणाल्या की, महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचना योजनेला पाठिंबा देणे विरोधी पक्षांना शक्य नाही; जर सरकार खरोखरच गंभीर असेल, तर त्यांनी २०२३ चा कायदा लागू करावा.
त्या म्हणाल्या की, महिला आरक्षणाचा वापर करून कायम सत्तेत राहणे हाच भाजपचा संपूर्ण कट आहे. काल लोकसभेत जे घडले, तो लोकशाही आणि विरोधी पक्षांच्या एकतेचा मोठा विजय आहे.






