Priyanka Gandhi on PM। काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच्या भाषणातील ‘ड्रामा’ या शब्दावरून जोरदार पलटवार केला आहे. महागाई आणि प्रदूषण यासारख्या सार्वजनिक मुद्द्यांवर चर्चा टाळणे हाच खरा ड्रामा आहे असे देखील त्या म्हणाल्या. हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी विरोधकांना फटकारले. तसेच सभागृह गोंधळासाठी नाही. नाटकासाठी बाहेर भरपूर वाव आहे, जिथे ते करू शकतात, परंतु भाषण सभागृहातूनच व्हायला हवे. प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांच्या या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे. ‘प्रश्न आणि मुद्दे उपस्थित करणे हे नाटक नाही’ Priyanka Gandhi on PM। आज सकाळी माध्यमांशी बोलताना प्रियांका गांधी यांनी, “संसदेत मुद्दे उपस्थित करणे हा ड्रामा नाही. निवडणुकीच्या परिस्थितीत, साहेब, प्रदूषण हा एक मोठा मुद्दा आहे. त्यावर चर्चा करूया. संसद कशासाठी आहे? हा ड्रामा नाही. बोलणे आणि मुद्दे उपस्थित करणे हा ड्रामा नाही.”असं त्या म्हणाल्या. त्यासोबतच पुढे बोलताना त्यांनी, मुद्द्यांवर चर्चा होऊ न देणे आणि त्यावर चर्चा न करणे हा ड्रामा आहे. ड्रामा म्हणजे जनतेसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर लोकशाही चर्चेला रोखणे आहे.” असे म्हणत पंतप्रधानांच्या टीकेला उत्तर दिले आहे. विरोधकांचा गोंधळ Priyanka Gandhi on PM। लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होताच, विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ घातला. महागाई, बेरोजगारी आणि इतर कायद्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली, ज्यामुळे सभागृहाच्या कामकाजात वारंवार व्यत्यय येत होता.