प्रियांका चोप्राचा मेट गाला २०२५ मध्ये जलवा; पती निक जोनससोबत ‘हटके फोटोशूट’, फोटोत दिसणारी ती कोण?

Priyanka Chopra : बॅालीवूड इंडस्ट्री गाजवल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्राने हॅालीवूड चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. नुकतेच तिने एक हटके फोटोशूट केले असून हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
प्रियांकाने हे फोटो तिच्या इन्स्टावर शेअर केले आहेत. या फोटोत तिची मुलगी मालती देखील दिसत आहे. या फोटोंमधून प्रियांकाची अनोखी झलक पाहायला मिळत आहे. या फोटोतून प्रियांकाने पुन्हा एकदा तिच्या मुलीचा मेट गाला लूक २०२५ शेअर केला आहे. यासोबतच तिने पती नेक जोनससोबतचे देखील फोटो शेअर केले आहेत.
प्रियांका चोप्रा मेट गालामध्ये पोल्का डॉट सूट ड्रेस परिधान केला होता. डोक्यावर काळ्या रंगाची हॅट तिने घातली असून हातात ग्लव्स घालून ती पोझ देत आहे. तसेच दुसऱ्या एका फोटोत तिने परिधान केलेली पांढऱ्या रंगाची आऊटफिट तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये प्रियांकाने ‘या डेट नाईटबद्दल अजूनही विचार करत आहे.. #MET25.’ असे लिहिले आहे.
या फोटोंमध्ये प्रियांका चोप्राचा पती नेक जोनास देखील दिसत आहे. प्रियांका आणि जोनस यांच्या चाहत्यांनी त्यांच्या फोटोंवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्रीची ही पोस्ट खूप लाईक केली जात आहे.
View this post on Instagram
या फोटोंमध्ये प्रियांकाने तिची मुलगी मालती हिचा देखील फोटो शेअर केला आहे. मालती तिच्या आईची हॅट आणि ग्लव्स घालून लाल रंगाच्या कपड्यांमध्ये खूपच गोंडस दिसत आहे. मात्र, या फोटोत ती पाठमोरी उभी असल्याने तिचा चेहरा दिसत नाही. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना खूप लाईक केले जात आहेत.





