प्रियांका चहर चौधरी तेलुगू सिनेमात करणार पदार्पण

Priyanka Chahar Choudhary| अभिनेत्री प्रियांका चहर चौधरीने टीव्ही क्षेत्रात मोठे यश मिळवले. नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली प्रियांका तिच्या नव्या सिनेमामुळे चर्चेत आली आहे. दिव्या खोसला स्टारर तेलगू चित्रपट ‘हीरो हिरोइन’ या चित्रपटात प्रियांका दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे.
या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने प्रियांकाने देखील आनंद व्यक्त केला आहे. प्रियंका म्हणाली, ‘मी ‘हीरो हिरोईन’चा भाग असल्याने खूप आनंदी आहे. चित्रपट निर्मात्या प्रेरणा अरोरासोबत काम करणे खरोखरच अद्भुत आहे. या चित्रपटाची कथा हृदयस्पर्शी आहे आणि मी या चित्रपटाद्वारे तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे.”
प्रेरणा अरोरा निर्मित ‘हीरो हिरोईन’ मध्ये परेश रावल आणि सोनी राजदान यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे शूटिंग जुलैमध्ये रामोजी फिल्म सिटी, हैदराबादमध्ये सुरू होणार आहे. सुरेश कुमार दिग्दर्शित, दिव्या तेलगू-हिंदी चित्रपट “हीरो हिरोईन” मध्ये प्रियदर्शिनीची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, प्रियांकाने 2018 मध्ये ‘लतीफ टू लादेन’ या चित्रपटात चांदनीची भूमिका साकारली होती. यानंतर 2019 मध्ये ‘गठबंधन’द्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. याशिवाय ती क्राइम थ्रिलर चित्रपट ‘कँडी ट्विस्ट’मध्येही ती दिसली होती. ती रिॲलिटी शो ‘बिग बॉस 16’ मध्येही दिसली. पण प्रियांका या सीझनचे प्रियांकाला विजेतेपद मिळवता आले नाही. तर बिग बॉस 16 चा एमसी स्टॅनन विजेता ठरला होता. Priyanka Chahar Choudhary|
हेही वाचा:
Sara Ali Khan । सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत सारा अली खान झाली ‘भावूक’





