प्रियंका चाहर चौधरी पडली गंभीर आजारी

entertainment – टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ ची फायनलिस्ट प्रियांका चहर चौधरीच्या तब्येतीबाबत,गेल्या काही दिवसांपासून बातम्या येत आहे. ती काही दिवसापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहे. आता याबाबत ‘उडारिया’ फेम सह-अभिनेत्रीनेही माहिती दिली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर अभिनेत्रीचे चाहते चिंता व्यक्त करत आहे. ते तिच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहे.
प्रियांका चहर चौधरीचा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तिच्या हातात कॅन्युला आणि ड्रिप पाईप असल्याचे दिसत आहे. मात्र, ती आता बरी आहे. ‘उडारिया’ फेम अभिनेत्री कमल डालदियाला हिने अभिनेत्रीच्या तब्येतीची माहिती दिली आहे. या टीव्ही सीरियलमध्ये तिने प्रियांकाच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारली होती. तिने प्रियांकाचा हातात कॅन्युला असलेला फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘लवकर बरी हो. पुन्हा आमची आनंदी बबली गर्ल पाहिलेसारखी व्हावी असेही लिहिले आहे
प्रियांका चहर चौधरीच्या प्रकृतीबाबत चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. प्रियंकाला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे. दरम्यान प्रियंका चहर चौधरीच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सांगायचे तर तिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. ‘ये है चाहते’ आणि ‘गाठबंधन’मध्ये प्रियांका पहिल्यांदा छोट्या भूमिकांमध्ये दिसली होती. ‘उदारियां’मधून ही अभिनेत्री पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसली होती. यामध्ये तिने तेजो सिंग विर्कची भूमिका साकारली होती. या टीव्ही मालिकेत तीला खूप आवडले होते. यानंतर ती सलमान खानच्या शो ‘बिग बॉस 16’ मध्ये दिसली होती. यामध्ये सलमान खानने त्याचे खूप कौतुक केले होते. ती या शोची फायनलिस्ट होती.





