Priyank Kharge on RSS । “जर काँग्रेस पुन्हा केंद्रात सत्तेत आली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) देशभरात बंदी घातली जाईल” अशी मोठी घोषणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खरगे यांनी केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सतत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत आहेत आणि देशाचे विभाजन करण्याचा आरोप करत आहेत. पण प्रियांक खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देशभरात बंदी घालण्याबद्दल बोलून नव्या वादाला तोंड फोडले आहे. ‘ RSS समाजात द्वेष पसरवत आहे’ प्रियांक खरगे यांनी यावेळी बोलताना,” देशात द्वेष कोण पसरवत आहे, जातीय हिंसाचाराला कोण जबाबदार आहे, संविधान बदलण्याबद्दल कोण बोलत आहे? असे काही सवाल उपस्थित केले. पुढे प्रियांक खरगे म्हणाले की, “संघ त्यांच्या राजकीय शाखेतील भाजपला महत्वाचे प्रश्न का विचारत नाही की देशात बेरोजगारी का वाढत आहे,” पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला कसा झाला? हे न विचारता संघाचे लोक समाजात द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. सत्तेत आल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत देशात आरएसएसवर बंदी घातली जाईल, “असे ते म्हणाले. कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी पुढे बोलताना, “ईडी, आयटी सारख्या सर्व तपास संस्था फक्त विरोधकांसाठी आहेत का, सरकार आरएसएसची चौकशी का करत नाही, त्यांचे पैसे कुठून येत आहेत, त्यांचे उत्पन्नाचे स्रोत काय आहे. प्रियांक खरगे म्हणाले की, संघाचे लोक दरवेळी द्वेषपूर्ण भाषणे देऊन आणि संविधान बदलण्याबद्दल बोलून कसे पळून जातात, आर्थिक गुन्हे करून ते कसे पळून जातात, या सर्व मुद्द्यांची चौकशी झाली पाहिजे.”अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. प्रियांक यांनी सोशल मीडियावर केली पोस्ट प्रियांक खरगे यांनी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांना उत्तर म्हणून सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट केली होती. ज्यामध्ये सूर्या यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेस हायकमांडबद्दल प्रश्न विचारला होता. प्रियांकने विचारले, ‘भाजपचा हायकमांड कोण आहे?’ तुमच्या बहुतेक कार्यकर्त्यांना तुमच्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाचे नावही सांगता येत नाही, त्यांच्यासाठी मोदी हे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि कदाचित पंचायत सचिव हे तिघेही आहेत.” असे म्हटले. तसेच प्रियांक खरगे पुढे म्हणाले, ‘जेव्हा परिस्थिती कठीण होते तेव्हा पंतप्रधान संसदेत जात नाहीत तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला रिपोर्ट करण्यासाठी नागपूरला जातात.’ त्यांनी तेजस्वी सूर्या यांना आव्हान दिले आणि म्हटले, ‘मी तुम्हाला आव्हान देतो की मोठ्याने म्हणा – मला आरएसएसची गरज नाही, मी निवडणुका जिंकू शकतो कारण मोदीजी आणि नड्डाजी हेच माझे एकमेव हायकमांड आहेत, आता आणि नेहमीच.’ यापूर्वीही बंदी घालण्याची चर्चा होती प्रियांक खरगे यांनी असे विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. दोन वर्षांपूर्वीही, कर्नाटकच्या संदर्भात, त्यांनी म्हटले होते की जर कोणत्याही संघटनेने राज्यातील शांतता भंग करण्याचा किंवा सांप्रदायिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर सरकार त्यावर बंदी घालण्यास अजिबात मागेपुढे पाहणार नाही. कर्नाटकातील काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की, राज्यात सत्तेत येताच, जाती आणि धर्माच्या आधारावर समुदायांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या बजरंग दल, पीएफआयसह सर्व संघटनांवर कडक कारवाई करून त्यांच्यावर बंदी घातली जाईल. प्रियांक खरगे यांनी या जाहीरनाम्यात म्हटले होते की, “आम्ही कायद्यानुसारच आणि कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करणार आहोत. जेव्हा प्रियांकला विचारण्यात आले की सरकार आरएसएस आणि बजरंग दलावरही बंदी घालणार आहे का? तर यावर ते म्हणाले, ‘शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही संघटनेवर किंवा व्यक्तीवर कारवाई केली जाईल.’ जरी मी असतो तरी?” केशव बाळाराम हेडगेवार यांनी 27 सप्टेंबर 1925 रोजी विजयादशमीच्या दिवशी आरएसएसची स्थापना केली. परंतु आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे या संघटनेवर तीनदा बंदी घालण्यात आली आहे. १९४८ मध्ये महात्मा गांधींच्या हत्येनंतर, त्यांच्या हत्येचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडला गेल्याने संघावर १८ महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली. यानंतर, १९७५ मध्ये, इंदिरा गांधींच्या सरकारने आणीबाणीला विरोध केल्याबद्दल आरएसएसवर बंदी घातली, जी दोन वर्षे चालू राहिली. अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात संघाची भूमिका असल्याने १९९२ मध्ये तिसऱ्यांदा आरएसएसवर बंदी घालण्यात आली. पण ही बंदी ६ महिन्यांनी उठवण्यात आली. हेही वाचा शाब्दिक युद्ध पुन्हा सुरु ! मस्कच्या आव्हानाला ट्रम्पचे धमकीने उत्तर ; म्हणाले,”…तर त्यांच दुकान बंद करावं लागणार ..”