खासगी शाळांचे वेतन जूनपर्यंत “ऑफलाइन’
Updated On:

पुणे – राज्यातील खासगी अंशत: व पूर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील काही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी न मिळाल्यामुळे त्यांचे जूनपर्यंतचे वेतन ऑफलाइन वितरित करण्यात येणार आहे.
हे वेतन देण्यासाठी शालार्थ आयडी बंधनकारक आहे. मात्र, वांरवार सूचना देऊनही अनेकांना अद्यापही शालार्थ आयडी देण्यात आले नसल्याची बाब उघड झाली आहे. यामुळे यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर संबंधित शिक्षकांना ऑफलाइनद्वारे वेतन अदा करण्यास राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे.





