Pune News| बावधन येथील पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन बुधवार, दिनांक 05/02/2025 रोजी यशवंतराव चव्हाण येथे आयोजित करण्यात आले होते. “गरिमा द कल्चरल हेरिटेज ऑफ महाराष्ट्र” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून 550 मुलांनी आपले भव्य दिव्य असे कलागुण सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
आयोजित स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व राज्यातील संस्कृती, परंपरा, जडणघडण, कला, साहित्य याचे अप्रतिम दर्शन प्रस्तुत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम व स्त्री सन्मानासाठी महाभारत हा स्पेशल ॲक्ट सादर करून उपस्थित त्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्यांना, गाण्यांना टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद मिळाला.
यावेळी भाषाप्रभू, अध्यात्मिक गुरु, कीर्तनकार अयोध्या येथे कीर्तन करणारे पहिले कीर्तनकार श्री.पंकज महाराज गावडे, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ,हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. माजी गट नेते जिल्हापरिषद शांताराम इंगवले, माजी सभापती बाबासाहेब कांधारे, तसेच मायाताई गावडे, केंद्रीय मंञि मुरली आण्णा मोहोळ यांचे बंधु प्रभाकर मोहोळ, उद्योगपती नंदकुमार वाळंज, नगरसेवक नितीनजी मोरे, उपमहाराष्ट्र केसरी सचिनजी मोहोळ, अध्यक्ष शिवसेना मुळशी तालुका सचिन खैरे, अध्यक्ष भाजपा मुळशी तालुका राजाभाऊ वाघ, नगरसेविका अल्पनाताई वर्पे, गणेश वरपे, एनसीपी पुणे शहर उपाध्यक्ष अभिजीत दगडे, बाजार समिती संचालक रामभाऊ गायकवाड, आदर्श सरपंच नामदेवअण्णा माझीरे,बावधन उपसरपंच बापूसाहेब दगडे, सरपंच भूकुम गौरी भरतवंश, बाळासाहेब विचारे,पत्रकार बंडू दातीर,योगेश सोनवणे हे मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे बहाल करण्यात आली. याप्रमाणेच सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ, नारळ,शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांचा मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार कण्यात आला.
चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ.रेखा बांदल, शिवानी बांदल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व युवा संचालक श्री.यश बांदल सर यांनी संस्थेच्या पुढच्या वाटचालींची माहिती दिली. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांनी प्रास्ताविकेतून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
उपस्थित मान्यवर अध्यात्मिक गुरु श्री. गावडे महाराज यांनी या स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नृत्याविष्कारासाठी व व्यवस्थापनेसाठी पेरीविंकलच्या मुख्याध्यापिका सौ.निर्मल पंडित व सर्व शिक्षकांना कौतुकाची थाप दिली तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रमाणे माजी सभापती बाबासाहेब कांधारे सर यांनी “गरिमा द कल्चरल हेरिटेज ऑफ महाराष्ट्र” ही संकल्पना अतिशय विस्तृतपणे मांडून पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन ही कलेचा सांस्कृतिक वारसा जपण्यात पुन्हा एकदा यशस्वी झाली आहे असे प्रतिपादन केले व पेरिविंकलचा चढता आलेख असाच उत्तरोत्तर प्रगती करू दे अशी आशा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे नियोजन पेरिविंकल स्कूलच्या मुख्याध्यापिका व सौ. निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका,कल्याणी शेळके, शिरीन काझी, प्रज्ञा जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन सायली गायकवाड, तनुश्री देबनाथ, निमिशा कुलकर्णी व विद्यार्थ्यांनी केले.