तपास अधिकारी माहिती सांगण्यास असमर्थ
पुणे – येरवडा येथील तात्पुरच्या कारागृहात दौन कैद्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात जेवण्याची ऍल्युमिनिअमची थाली मारली. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तुकाराम येनपुरे(19) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी जेलमधील कर्मचारी सत्वशील पाटील(30,रा.येरवडा वसाहत) याने फिर्याद दिली आहे. तर कैदी सोहेल शेख हा जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनूसार येनपुरे आणी शेख दोघांनाही वेगवेगळ्या गुन्हयांत तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. शनिवारी रात्री येनपुरे शेखला तु चोरी कशी केली हे वारंवार विचारत होता. शेखने त्याला घटना सांगितली असताना सुध्दा तो तु खोटे बोलत आहेस असे सांगून वाद घालत होता.
वाद वाढल्यावर येनपुरेने शेखच्या डोक्यात ऍल्युमिनिअमची थाळी मारुन जखमी केले. दरम्यान तपास अधिकारी सचिन बनसवडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी माहिती सांगण्यास असमर्थता व्यक्त केली. माहिती पोलिस आयुक्तालयात दिली आहे. तेथेच संपर्क साधवा असे सांगण्यात आले.