पुणे – भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक प्रक्रिया देशभरात सुरू असून तिसऱ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहे. नूमवी प्रशाला येथे नवरी श्रध्दा भगत हिने आपला मतदानाचा हक्क बजावला.
पुणे लोकसभा मतदारसंघातून 31उमेदवार रिंगणात आहे. या उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) बंद होणार आहे.