Tokyo Olympics : पंतप्रधान देणार सिंधूला आइसस्क्रीम पार्टी
Updated On:

नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकवरून पदक जिंकून आलीस तर आपण आईसस्क्रीम पार्टी करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी. व्ही. सिंधूला सांगितले होते. त्यांच्या याच वचनाची पूर्तता आता लवकरच होणार आहे.
टोकियोतून मायदेशी परतल्यावर ऑलिम्पिक ब्रॉंझपदक पंतप्रधानांना दाखवण्यासाठी सिंधू दिल्लीला जाणार आहे. याचवेळी पंतप्रधानांबरोबर ती आइसस्क्रीमही खाणार आहे.
सिंधूने सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक जिंकून यशस्वी कामगिरीत सातत्य राखले असून, त्यावर पंतप्रधान मोदी यांनी तिचे कौतुक केले आहे.
तू देशाची शान आहेस व तू मिळवलेल्या यशाचा एक भारतीय म्हणून मला गर्व आहे, अशा शब्दांत मोदी यांनी सिंधूबाबत गौरवोद्गार काढले आहेत.





