Prime Minister on Budget । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात तरुणांसोबत महिलांचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यासोबतच युवकांसाठी तब्बल २ लाख कोटींची तरतूद करण्यात करण्यात आली आहे. तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणवरही भर देण्यात आला आहे. शेतकरी, महिला, करदाते आणि पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या नोकरदारांसाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. याच अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्थसंकल्प देशाच्या विकासाला नव्या उंचीवर नेणार Prime Minister on Budget । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत बोलताना समाधान व्यक्त केले. तसेच या अर्थसंकल्पाने मध्यमवर्गीय नागरिक अधिक सक्षम होणार असल्याचे म्हटले. अर्थसंकल्प देशाच्या विकासाला नव्या उंचीवर नेईल. याचा फायदा समाजातील सर्व घटकांना होणार आहे. तरुणांना अनेक संधी मिळतील, तर दलित आणि मागास समाजातील लोक अधिक मजबूत होतील. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अर्थसंकल्प महिलांचा आर्थिक सहभाग सुनिश्चित करेल. याशिवाय आर्थिक विकासालाही नवी गती मिळणार आहे. अर्थसंकल्पामुळे तरुणांना अमर्याद संधी Prime Minister on Budget । पीएम मोदी म्हणाले, “गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. हा अर्थसंकल्प नव्या मध्यमवर्गाच्या सक्षमीकरणासाठी आहे. या अर्थसंकल्पामुळे तरुणांना अमर्याद संधी उपलब्ध होतील. हा अर्थसंकल्प तरुणांना एक नवीन स्केल देईल. शिक्षण आणि कौशल्य हे बजेट नवीन मध्यमवर्गीयांना बळ देईल आणि महिला, छोटे व्यापारी आणि एमएसएमईंना मदत करेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (२३ जुलै) विक्रमी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. उत्पादन आणि पायाभूत सुविधांवर जास्त भर आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, “आदिवासी समाज, दलित आणि मागासवर्गीयांना सशक्त करण्यासाठी हा अर्थसंकल्प आहे. उत्पादन आणि पायाभूत सुविधांवर या अर्थसंकल्पात भरपूर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.” केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारमध्ये तीन द्रुतगती मार्ग आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर दोन नवीन पूल बांधण्यासाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच अमरावती ही राजधानी म्हणून तयार करण्यासाठी केंद्र सरकार आंध्र प्रदेशला 15 हजार कोटी रुपये देणार आहे. आयकर कमी करण्याचा निर्णय पीएम मोदी म्हणाले, “या अर्थसंकल्पात सरकारने ‘एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम’ जाहीर केली आहे. यामुळे देशात कोट्यावधी नवीन नोकऱ्या निर्माण होतील. या अर्थसंकल्पाने आमच्या स्टार्टअप्स आणि इनोव्हेशन इकोसिस्टमसाठी अनेक नवीन संधी दिल्या आहेत.” ते म्हणाले, “गेल्या 10 वर्षांत एनडीए सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीयांना सातत्याने कर सवलत दिली आहे. या अर्थसंकल्पातही आयकर कमी करण्याचा आणि मानक वजावट वाढवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.”