पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; वाहतूक सेवेत बदल

PM Modi Road Show in Mumbai| पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचार सभा, रोड शोचे आयोजन करत आहे. लोकसभा निवडणूकीतील पहिल्या चार टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर महाराष्ट्रातील काही उर्वरित जागांवर मतदान होणार आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
नरेंद्र मोदी दिंडोरी आणि कल्याण येथे एका सभेला संबोधित केल्यानंतर उत्तर पूर्व मुंबई येथे एक रोड शो करणार आहेत. यानिमित्त पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त असणार आहे. मोदींच्या रोड-शो असल्यामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. भाजप महायुतीचे मुंबई उत्तर पूर्व लोकसभेचे उमेदवार मिहिर कोटेच्या यांच्या प्रचारासाठी मोदींच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचे मतदान २० मे रोजी होणार आहे. या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे आणि पालघर या मतदारसंघात या पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. १८ मे रोजी या टप्प्याच्या प्रचाराची सांगता होणार आहे. त्यानुसार दुपारी पंतप्रधान मोदी दिंडोरी येथे एका सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी कल्याण येथे प्रचारसभा घेणार आहेत.
असा होणार मोदींचा रोड-शो ? PM Modi Road Show in Mumbai|
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे साडे सहा वाजता मोदी विक्रोळी येथे आगमन होईल. त्यानंतर हा 6.45 मिनिटांनी रोड शो सुरू होईल. अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रीज असा मोदींचा रोड-शो असणार आहे. मोदींचा घाटकोपरमध्ये जवळपास अडीच किमीचा रोड-शो असणार आहे. अशोक सिल्क मिल पासून सर्वोदय सिग्नल, सांघवी स्क्वेअर, पार्श्वनाथ चौक, श्रैयस टॉकीज, सीआयडी ऑफिस, हवेली ब्रीज असा मोदींचा रोड-शो होणार आहे. भाजपच्या मुंबईच्या उमेदवारांसाठी हा रोड-शो असेल. या रोड-शोच्या माध्यमातून भाजपकडून प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या या रोड शो मार्गातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आज दुपारी 2 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत मुंबईच्या एल.बी.एस मार्ग बंद राहणार आहे. तसेच माहुल घाटकोपर रोडवरील मेघराज जंक्शन ते आर.बी कदम जंक्शन पर्यंत उत्तर आणि दक्षिण बाजूची वाहतूकहीदुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. PM Modi Road Show in Mumbai|
वाहतूक सेवेत बदल
– LBS मार्गावरील रोड-शोसाठी वाहतूक पोलिसांचे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. LBS-गांधीनगर जंक्शन-नौपाडा जंक्शन-माहूल घाटकोपर मार्ग दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
– मेघराज जंक्शन-आरबी कदम जंक्शनपर्यंतची वाहतूकही बंद राहणार आहे.
-हिरानंदानी कॉम्प्लेक्स ते गुलाटी पेट्रोल पंपापर्यंत वाहतूक बंद केली जाऊ शकते.
– अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन हे मार्ग बंद केले जाण्याची शक्यता आहे.
– गोळीबार मैदान, घाटकोपर मेट्रो स्टेशन पश्चिमेकडील सर्वोदय जंक्शनपर्यंत वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
भाजपच्या फायर ब्रँड नेत्यावर गुन्हा दाखल ? नेमकं काय आहे प्रकरण





