एपीएमसी (APMC)ची व्यवस्था बंद होणार नाही – पंतप्रधान मोदी

Updated On:

नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार बांधील आहे आणि नव्याने केलेल्या तीन कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणार आहे. केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांचं जोरदार समर्थन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

नव्या कृषी कायद्यांची माहिती देण्यासाठी मध्य प्रदेशातील रायसेन येथे शेतकरी महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महासंमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. तसेच यावेळी नव्या कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांना मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला.

कृषी कायद्यांबाबत APMC  (कृषी उत्पन्न बाजार समिती) ला घेऊन एक संभ्रम निर्माण केला जात आहे.  याबदल स्पष्टीकरण देत APMC ची व्यवस्था बंद होणार नसल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. 

एपीएमसी बदल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, कृषी कायद्यांबाबत एपीएमसी (APMC) ला घेऊन अजून एक संभ्रम निर्माण केला जात आहे. आम्ही शेतकऱ्यांना एक पर्याय दिला आहे. गेल्या सत्तर वर्षांपासून शेतकऱ्याना फक्त एपीएमसी (APMC) मध्येत धान्य विक्री करण्यासाठी सांगितलं जात आहे. आम्ही त्यात बदल केला आहे. नव्या कायद्यानुसार शेतकरी आपलं धान्य एपीएमसी (APMC) मध्ये विकतील किंवा बाहेर त्यांना जिथे भाव मिळेल तिथे विकतील. लोकशाहीत शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार नको का? असा प्रश्न विचारत एपीएमसी (APMC) ची व्यवस्था बंद होणार नसल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

आणखी संबंधित बातम्या

Himanta Biswa Sarma : ...तोपर्यंत तुम्ही मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही; 'या' नेत्याचा राहुल गांधींना इशारा

2026-10-08 17:58:49

Himanta Biswa Sarma : ...तोपर्यंत तुम्ही मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही; 'या' नेत्याचा राहुल गांधींना इशारा

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

2026-10-07 22:53:07

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Nitin Nabin : नरेंद्र मोदी हे जनतेने थेट निवडलेले पहिले पंतप्रधान; नितीन नविन यांच्याकडून मोदींचे कौतुक

2026-10-07 16:58:14

Nitin Nabin : नरेंद्र मोदी हे जनतेने थेट निवडलेले पहिले पंतप्रधान; नितीन नविन यांच्याकडून मोदींचे कौतुक

PM Modi: पंतप्रधान मोदींनी देवाकडे काय मागितलं? ; जनसेवेची २५ वर्षे पूर्ण होताच स्वतःच केला खुलासा

2026-10-07 12:04:07

PM Modi: पंतप्रधान मोदींनी देवाकडे काय मागितलं? ; जनसेवेची २५ वर्षे पूर्ण होताच स्वतःच केला खुलासा