PM Modi Manipur visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी (दि. 13) मणिपूर दौर्यावर जाणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांनी शुक्रवारी याची अधिकृत माहिती दिली. दोन वर्षांपूर्वी मैतेई व कुकी समुदायांमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारानंतर मोदी यांचा हा मणिपूरमधील पहिलाच दौरा आहे. हिंसाचार उफाळत असताना मोदी यांनी मणिपुरला भेट दिली नसल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यामुळे मोदींच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, मे 2023 पासून या जातीय संघर्षात 260 हून अधिक लोक मरण पावले आहेत आणि हजारो लोक बेघर झाले आहेत. या दौऱ्यात मोदी चुराचांदपूर आणि इंफाल येथे हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या लोकांशी संवाद साधतील आणि राज्यात अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. 7,300 कोटींच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी चुराचांदपूर येथे पंतप्रधान मोदी 7,300 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. यामध्ये 3,600 कोटींचा मणिपूर अर्बन रोडस्, ड्रेनेज आणि अॅसेट मॅनेजमेंट प्रकल्प, 2,500 कोटींचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, मणिपूर इन्फोटेक डेव्हलपमेंट प्रकल्प, तसेच कामगार महिलांसाठी वसतिगृहे यांचा समावेश आहे. इंफाळमध्ये पंतप्रधान मंत्रिपुखी येथील सिव्हिल सचिवालय, आयटी एसईझेड इमारत, नवीन पोलिस मुख्यालय, तसेच दिल्ली व कोलकाता येथील मणिपूर भवनांचे उद्घाटन करतील. PM Modi Manipur visit | मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची टीका दुसरीकडे, मोदींच्या दौऱ्याच्या घोषणेवर काँग्रेसने हा दौरा शांतता आणि सौहार्दाला बळ देण्याऐवजी ‘नौटंकी’ ठरेल, असा अशी टीका केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, ‘आता हे अधिकृत समजले आहे, की मोदी हे मणिपूरमध्ये तीन तास व्यतीत करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे शांततेला चालना मिळणार नसून, उलट तो हास्यास्पद ठरणार आहे.’ तर काँग्रेस नेते व लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदींच्या दौर्याचे स्वागत करत उशिरा घेतलेला निर्णय, अशी टीका केली PM Modi Manipur visit | इंफालमधील सुमारे 237 एकरांमध्ये पसरलेल्या कांगला किल्ल्यामध्ये आणि चुराचांदपूरच्या पीस ग्राउंड परिसरात आणि त्याच्या आसपास मोठ्या संख्येने राज्य आणि केंद्रीय सैन्याचे जवान तैनात करण्यात आले आहेत. जिथे या कार्यक्रमासाठी एक भव्य व्यासपीठ तयार केले जात आहे. तीन दिवसीय दौऱ्यात देणार पाच राज्यांना भेट याशिवाय पंतप्रधान मोदी 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान मिझोरम, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारलाही भेट देणार आहेत. मिझोराममध्ये ते आयझोल-दिल्लीदरम्यान पहिल्या राजधानी एक्स्प्रेससह इतर नव्या रेल्वेंना हिरवी झेंडी दाखवतील. त्यानंतर आसाममध्ये १३ रोजी सायंकाळनंतर १४ सप्टेंबरपर्यंत मोदी आसाम दौऱ्यात भारतरत्न भूपेन हजारिका जन्मशताब्दी महोत्सवात सहभागी होतील. १५ सप्टेंबरला कोलकात्यात संयुक्त कमांडर संमेलनाचे उद्घाटन करतील आणि त्याचदिवशी बिहारमध्ये पूर्णिया येथे राष्ट्रीय मखाना महामंडळाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते केले जाईल. हेही वाचा: Ayush Komkar Murder Case | आरोपींची पोलीस कोठडी २२ सप्टेंबरपर्यंत वाढ ; शस्त्र आणि कटाबाबत चौकशी तीव्रतेने सुरू