पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते; ट्रम्प आणि मेलोनी कितव्या स्थानी?

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आले आहेत. बिजनेस इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टकडून जुलै 2025चा अहवाल समोर आला असून, यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना 75 टक्के लोकांचा पाठींबा मिळाला आहे.
मॉर्निंग कन्सल्टकडून जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रियतेत पहिल्या स्थानी आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग आहेत. त्यांना 59 टक्के अप्रूवल रेटिंग मिळालं आहे.या सर्वेमध्ये 20 हून अधिक देशांच्या नेत्यांचा समावेश होता. तसेच हा सर्वे 4 ते 10 जुलै दरम्यान करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
अमित मालवीय पोस्ट –
पंतप्रधान मोदींच्या सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवड झाल्याबाबत भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अमित मालवीय यांनी लिहिले आहे की, ‘एक अब्जाहून अधिक भारतीयांचे आवडते आणि जगभरातील लाखो लोकांच्या आदराचे पात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मॉर्निंग कन्सल्ट ग्लोबल लीडर अप्रूवल ट्रॅकरमध्ये अव्वल स्थानावर आहेत. जगातील सर्वोच्च रेटिंग मिळालेले आहे. सर्वात विश्वासार्ह नेते, मजबूत नेतृत्व, वैश्विक सन्मान, भारत सुरक्षित हातात आहे.’ PM Narendra Modi |
Loved by over a billion Indians and respected by millions across the globe, PM Narendra Modi tops the Morning Consult Global Leader Approval Tracker once again — the highest-rated and most trusted leader worldwide.
Strong leadership. Global respect. Bharat is in safe hands. 🙌 pic.twitter.com/eYbtiiyjmt
— Amit Malviya (@amitmalviya) July 26, 2025
मोदींनी ट्रम्प आणि मेलोनी यांना टाकलं मागे
या सर्वेनुसार, लोकप्रियतेच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प आणि मेलोनीसारख्या नेत्यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे टाकले आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग आहेत, त्यांना 59 टक्के रेटिंग मिळाले आहे. तिसऱ्या क्रमांकावर अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिलेई आहेत, त्यांना 57 टक्के मते मिळाली आहेत. यानंतर कॅनडाचे मार्क कार्नी यांना 56 टक्के आणि ऑस्ट्रेलियाचे अँथनी अल्बनीज यांना 54 टक्के रेटिंग मिळाले आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांना 44 टक्के रेटिंग मिळाले आहे. तसेच, इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांना 40 टक्के रेटिंग मिळाले आहे.
सर्वात कमी लोकप्रिय नेत्यांमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि झेक रिपब्लिकचे पंतप्रधान पेट्र फिआला यांचा समावेश आहे. त्यांना फक्त 18 टक्के लोकांकडून अप्रूवल रेटिंग देण्यात आले असून 74 टक्के लोक त्यांच्या विरोधात आहेत.
हेही वाचा :
Maharashtra Political : धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? अजित पवारांच्या विधानाने भुवया उंचावलत्या





