पंतप्रधान मोदींचे कॅनडाला जशाच तसे उत्तर; म्हणाले…

PM Modi And Justin Trudeau| नरेंद्र मोदी यांनी सलग 9 जून 2024 रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींना जगभरातील नेत्यांकडून अभिनंदनाचे संदेश आले आहेत. भारतासोबतचे संबंध ताणले असताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी नरेंद्र मोदींचे विजयाबद्दल अभिनंदन केले होते.
जस्टिन ट्रुडो यांनी चार दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे अभिनंदनाचा संदेश दिला होता. पण मोदींचे सोशल मीडियावर अभिनंदन करताना भारतावर एक टोमणा मारला होता. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रुडो यांना प्रत्युत्तर दिले आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस ट्रूडो यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींना विजयाबद्दल शुभेच्छा देताना खोडसाळपणे लिहिले की, ‘कॅनडाचे सरकार भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी तयार आहे आणि हे संबंध मानवाधिकारांवर आधारित असतील,’ यावर भारतानेही प्रत्त्युत्तर देत कॅनडाला आरसा दाखवला आहे. पंतप्रधान मोदींनी लिहिले की, “एकमेकांच्या चिंतेचा आदर करण्याच्या आधारावर कॅनडासोबत एकत्र काम करण्यास भारत उत्सुक आहे,” असे त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे.
Thank you @CanadianPM for the congratulatory message. India looks forward to working with Canada based on mutual understanding and respect for each others concerns. https://t.co/QQJFngoMyH
— Narendra Modi (@narendramodi) June 10, 2024
अलीकडेच कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत निज्जर यांच्या हत्येचा आरोप भारतावर केला आणि भारताने कॅनडातील कायद्याच्या राज्याचा आदर केला पाहिजे, असे सांगितले. मात्र, भारताने कॅनडाचे आरोप ठामपणे फेटाळून लावले होते आणि विधानाबाबत पुरावे मागितले होते. कॅनडाच्या पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना आता पंतप्रधान मोदींनीही कॅनडाला त्याच भाषेत उत्तर दिले होते.





