पणजी : गोवा दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, “नामदार मनोहर पर्रिकरांची विचारपूस करण्यासाठी गोव्यात दाखल झाले होते मात्र विचारपूस केल्यानंतर बाहेर निघाल्या-निघाल्या त्यांनी एक असं खोटं वक्तव्य केलं की ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. त्यावेळी मनोहरजी मृत्यूशी झुंज देत होते मात्र अशा खोटारड्यांच पितळ उघड करण्यासाठी त्यांना बाहेर पडावं लागलं होत.”
पंतप्रधानांनी मोदी यांनी राहुल गांधींना उद्देशून केलेलं हे वक्तव्य राहुल गांधींनी जानेवारीमध्ये मनोहर पर्रिकर यांची भेट घेतल्यानंतर राफेल संबंधात केलेल्या वक्तव्याशी निगडित आहे. राहुल गांधी यांनी मनोहर पर्रिकरांची भेट घेतल्यानंतर ट्विटरद्वारे ‘राफेल घोटाळ्याची गुपित माहिती आपल्याकडे असल्याचं’ पर्रिकरांनी आपल्याला सांगितल्याचा दावा केला होता. मात्र मनोहर पर्रिकरांनी याबाबत स्पष्टीकरण देताना राहुल गांधी व आपल्यामध्ये राफेलबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती असं म्हंटल होत.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आठवणींमुळे गहिवरून आले होते. आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना म्हंटले की, “मी गोवा दौऱ्यावर असून देखील मनोहर पर्रिकरजी माझ्यासोबत नसल्याची ही पहिलीच वेळ. मी याआधी देखील खूपदा गोवा दौऱ्यावर आलो मात्र माझ्यासोबत नेहमी मनोहर पर्रिकरजी असायचे. आज पर्रिकरजी आपल्या सोबत नाहीयेत याची खंत मनाला वाटते मात्र आपल्याला आता मनोहर पर्रिकरजी आपल्यात नसल्याचे सत्य स्वीकारावे लागेल. मनोहर पर्रिकरांनी आपल्या कार्यामधून जनतेच्या हितासाठी कशाप्रकारे काम करावे याचा आदर्श आपल्या समोर ठेवला आहे.”
PM Modi in Goa: Naamdaar poochne gaye the haalchal aur bahar nikalte hi aisa jhoot bola koi kalpana nahi kar sakta hai. Manohar ji jo maut se muqabla kar rahe the. Aisi paristithi main, ye jhoot bolne walon ko safai dene ke liye unko nikalna pada. https://t.co/jFHjhqVCXo
— ANI (@ANI) April 10, 2019