पंतप्रधान नरेंद्र मोदी महाकुंभ मेळ्यात उद्या करणार पवित्र स्नान ; ‘असा’ असेल त्यांचा दिनक्रम

Prime Minister in Kumbh Mela । पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभाला भेट देणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारी म्हणजेच उद्या प्रयागराजला भेट देणार आहेत. या काळात पंतप्रधान मोदी संगममध्ये पवित्र स्नानदेखील करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदी यांचा उद्याचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल याची माहिती आता समोर आली आहे. पंतप्रधान ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता प्रयागराज विमानतळावर पोहोचतील. ते प्रयागराज विमानतळावरून डीपीएस हेलिपॅडवर पोहोचतील, तेथून ते १०.४५ वाजता अरेअल घाटावर जातील. ते अरियाल घाटावर बोटीने महाकुंभाला पोहोचतील.
प्रयागराजमधील संगमावर पवित्र स्नान Prime Minister in Kumbh Mela ।
ते सकाळी ११ वाजता प्रयागराज येथील संगम येथे पवित्र स्नान करतील. महाकुंभमेळ्यात सकाळी ११ ते ११.३० ही वेळ पंतप्रधानांसाठी राखीव आहे. पवित्र स्नानानंतर, पंतप्रधान मोदी ११.४५ वाजता बोटीने अरेअल घाटावर परततील. येथून ते डीपीएस हेलिपॅडने प्रयागराज विमानतळावर पोहोचतील. पंतप्रधान मोदी दुपारी १२.३० वाजता हवाई दलाच्या विमानाने प्रयागराजहून परततील.
‘त्या’ नातेवाइकांचीही भेट घ्यावी Prime Minister in Kumbh Mela ।
दरम्यान , पंतप्रधानांच्या महाकुंभाला जाणार असल्याच्या वृत्तावर समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी बोलताना त्यांनी, “१९५४ मध्ये जेव्हा मोठी चेंगराचेंगरी झाली होती, तेव्हा जवाहरलाल नेहरूंनी पहिल्याच दिवशी सभागृहात सांगितले होते की ४०० लोक मारले गेले आणि २००० लोक जखमी झाले होते त्यांनी त्यांच्या निवेदनात, कोणताही व्हीआयपी तिथे जाऊ नये ज्यामुळे लोकांना गैरसोय होते, असे म्हटले होते. परंतु आमचे मुख्यमंत्री दररोज तिथे राहतात. पंतप्रधानांनी जायचे की नाही हे ठरवायचे आहे आणि जर ते गेले तर ज्यांचे लोक हरवले आहेत आणि जे त्यांना शोधत आहेत त्यांनाही त्यांनी भेटले पाहिजे.अशी मागणी त्यांनी वेळी केली.





