चेन्नाई – स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार झालेला अर्जून रणगाडा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराकडे सुपुर्त केला. लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी चेन्नाई येथे झालेल्या एका कार्यक्रमात या रणगाड्याचा स्वीकार केला.
चेन्नाईतील लढाऊ वाहने संशोधन संस्था आणि डीआरडीओने संयुक्तपणे हा रणगाडा विकसित केला आहे. भारत सरकारने 8400 कोटी रूपये खर्चुन हे रणगाडे उत्पादित करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. चेन्नाईत सुरू केल्या जाणाऱ्या 9 किमी लांबीच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम ही त्यांच्या हस्ते सुरू झाले.
तामिळनाडुत लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या हस्ते या विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. तामिळनाडुतील अन्य दोन रेल्वे मार्गाच्या कामाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले.