प्राथमिक शिक्षकाचा अपघातात मृत्यू शहरातील न्यू टिळक रस्त्यावर डंपरने चिरडले

नगर – शहरातील न्यू टिळक रास्त्यावर पेटल मंगल कार्यालयाकडे वळणार्या चौकात भरधाव वेगाणे आलेल्या डंपरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील प्राथमिक शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.१४) रोजी दुपारी घडली. संजय बाबाजी वामन (वय ५१ रा. पाइपलाईन रोड, नगर, मु. देवगाव), असे या मयत शिक्षकाचे नाव आहे.
मयत संजय वामन हे नगर तालुक्यातील निमगाव घाणा येथील कोल्हेटेक वस्तीवरील प्राथमिक शाळेत कार्यरत होते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून शनिवारी प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन समुपदेशाने बदली प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी ते नगर शहरात आले होते.
दुपारी साडेबाराच्या सुमारास न्यू टिळक रोडने दुचाकवर (क्र. एम.एच. १६. सी.आर. ९५८२) जात असतांना सक्कर चौकातून आयुर्वेद चौकाकडे भरभाव वेगात जाणार्या डंपरने पटेल मंगल कार्यालयाकडे वळणार्या चौकात त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत संजय वामन हे डंपरच्या चाकाखाली सापडून मयत झाले.
अपघातानंतर डंपर चालकाने डंपर वेगात नेऊन तो पसार झाला. काही नागरिकांनी कोतवाली पोलिसांना खबर दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होताच रुग्णवाहिका बोलावऊन मयत वामन यांचा मृतदेह शवविच्छेदासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत कोतवाली पोलीस् ठाण्यात अकास्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





