पुणे | साखर, खाद्यतेलाचेही भाव नरमले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- दिवाळीचा सण जवळ आला, तरी बाजारात अद्याप खरेदीचा उत्साह दिसत नाही. अपेक्षित मागणी नसल्यामुळे साखरेच्या दरात क्विंटलमागे 25 रुपयांनी घट झाली. खाद्यतेलांच्या दरातही 15 किलोमागे 25 ते 30 रुपयांनी घट झाली.
मात्र, गव्हाचे दर वाढल्यामुळे रवा आणि मैद्याच्या दरात 50 किलोमागे 25 रुपयांनी वाढ झाली आहे.
अपेक्षित मागणी नसल्यामुळे आणि नव्या तेलबियांची आवक वाढत असल्यामुळे खाद्यतेलाच्या दरात नरमाई आहे. सोयाबीन, तसेच भुईमूग शेंगेची आवक सुरू झाली असून, पावसाच्या उघडिपीमुळे आवक वाढत आहे.
त्यामुळे खाद्यतेलांचे दर कमी होण्यास मदत झाली. शेंगदाणा तेलासह अन्य सर्वच खाद्यतेलांचे दर गेल्या आठवड्यात 15 किलो/लिटर च्या डब्यामागे 25 ते 30 रुपयांनी कमी झाले. खोबरेल तेलाचे दर स्थिर होते. आवक जावक साधारण असल्यामुळे गुळाचे दर स्थिर होते.
बाजारातील दर पुढीलप्रमाणे –
साखर (प्रतिक्विंटल) 3875-3900 रु., पिठीसाखर 4000 रू.
खाद्यतेले (15 किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2500-2600, रिफाइंड तेलः 2300-2850, सरकी तेल 1900-2200, सोयाबीन तेल 1880-2150, पामतेल 1850-2000, सूर्यफूल रिफाइंड तेल 1900-2000, वनस्पती तूप 1800-2300, खोबरेल तेल 3300-3400 रु.
तांदूळ :- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3500-4000, सोना मसुरी 4500-5000, एचएमटी कोलम 5500-6500, लचकारी कोलम 6500-7000, चिन्नोर 4500-5000, 1121-11000-11500, आंबेमोहोर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 12000-13000, बासमती दुबार 9500-10000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500, बासमती कणी 4000-4500, 1509-8500-9500, इंद्रायणी 5500-6000 रु.
गहू – सौराष्ट्र लोकवन नं. 1 – 4300-4500, सौराष्ट्र लोकवन नं. 2 – 3800-4000, एमपी लोकवन नं.1 – 4200-4400, नं.2 – 3700-4000, नं.3 – 3300-3500, सिहोर 5600-6000, सिहोरी 4300-4300, मिलबर 3200-3250 रु.
ज्वारी :- गावरान नं. 1- 5100-5400, गावरान नं. 2- 4000-4400, नं. 3- 3300-3400, दूरी नं. 1- 3200-3300, दूरी नं. 2- 3000-3100 रु.
बाजरी :- महिको 3400-3800, गावरान 3200-3400, हायब्रीड 2800-3100 रु.
गूळ:- गूळ एक्स्ट्रा 4250-4400, गूळ नं. 1- 4050-4200, गूळ नं. 2- 3850-3950 गूळ नं. 3- 3700- 3800, बॉक्स पॅकिंग 4000-5200
डाळी:- तूरडाळ 13000-16000, हरभराडाळ 9100-9200, मूगडाळ 10000-10500, मसूरडाळ 7500-
7600, मटकीडाळ 9100-9200, उडीदडाळ 11000-12400 रु.
कडधान्ये:- हरभरा 8400-8500, हुलगा- 7200-7500 चवळी 9000-1100, मसूर 6800-6900, मूग 8500-9300, मटकी गावरान 8000-8200, मटकी पॉलिश 7000-7500, मटकी गुजरात 7000- 7500, मटकी राजस्थान 7000-7500, मटकी सेलम 9200-9300, वाटाणा हिरवा 15000-18000, वाटाणा पांढरा 4300-4400, काबुली चणा 11000-15000 रु.
साबुदाणा :- साबुदाणा नं. 1- 6500, साबुदाणा नं. 2- 6000, साबुदाणा नं. 3 – 5800 रु. वरई भगर :- 10500, सावा भगर 1000, गोटा खोबरे 190-210 रु.
शेंगदाणा :- जाडा 9800-10000, स्पॅनिश – 11000 घुंगरू 10500- 10700 टीजे 8700-1000
धने :- गावरान 9000-10000, इंदूर 12000-15000 रु.
पोहे :- मध्य प्रदेश 4600-4800, पेण 4500-4600, मध्यम पोहा 4400-4600, दगडी पोहा 4400- 4800, पातळ पोहा 5100-5700, सुपर पोहा 4900-5400, भाजका पोहा 650-750, मका पोहा 675-775, भाजके डाळे 4200-4800, मुरमुरा सुरती (9 किलोस) 570, भडंग 850-1000, घोटी 530, सुरती 570 रु.
रवा, मैदा, आटा – (50 किलोचा भाव) आटा 1750-1800, रवा 1930-1980, मैदा 1930-1980,
बेसन :- (50 किलोस) 5200-5400 रु.
मीठ :- मीठ खडे (50 किलोस) 225, मीठ दळलेले (50 किलोस) 250 रु.
मिरची:- काश्मिरी ढब्बी 35000-38000, ब्याडगी 20000-23000, लवंगी तेजा 20000-22000, गुंटूर 18000-20000, खुडवा गंटूर 8000-9000, खुडवा ब्याडगी 9000-10000 रु.
नारळ :- (शेकड्याचा भाव): नवा पॅकिंग 2000-2200, मद्रास 3500-3700, पालकोल जुना 2100- 2200, सापसोल 3900-3500 रु.


