रतन टाटा यांच्या निधनानंतर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शोकसंदेश, म्हणाल्या…
Updated On:

Ratan Tata Passes Away | रतन टाटा यांच्या निधनानंतर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले, “रतन टाटा यांच्या निधनामुळे भारताने एक असे व्यक्तिमत्त्व गमावले आहे, ज्यांनी उद्योगाच्या वाढीला राष्ट्रनिर्माणाशी जोडले, आणि उत्कृष्टतेला नीतिमूल्यांशी. पद्म विभूषण आणि पद्म भूषण पुरस्कारांचे मानकरी असलेल्या रतन टाटा यांनी टाटा समूहाची जगभरात ख्याती वाढवली.
त्यांनी अनुभवी व्यावसायिक आणि तरुण विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. त्यांच्या परोपकारी कार्याचे मूल्य अनमोल आहे. त्यांच्या कुटुंबीयांना, टाटा समूहाला आणि त्यांच्या जगभरातील चाहत्यांप्रती मी सांत्वन व्यक्त करते.”





