प्रभात वृत्तसेवा, पुणे, दि. 28 –सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया आणि उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नवी दिल्ली येथे भेटून शुभेच्छा देण्याची संधी मिळाली. डॉ. चोरडिया यांनी राष्ट्रपतींना शुभेच्छा दिल्या. सूर्यदत्त रौप्यमहोत्सवी स्मरणोत्सवाच्या माहिती पुस्तिकेची प्रथम प्रत भेट दिली. सुषमा चोरडिया यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना ओरिसा व परिसरातून सूर्यदत्तमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांची माहिती देणारी पुस्तिका, 2008-2010 बॅचच्या आठवणी व फोटो प्रॉस्पेक्टस व सूर्यदत्त वुमन एम्पावरमेंट अँड लीडरशिप ऍकॅडमीच्या सूर्यदत्त सोशल अँड वुमन एम्पावरमेंट इनिशिएटिव्हचे माहिती पुस्तक भेट दिले. याबद्दल राष्ट्रपतींनी अधिक माहिती घेतली. “सूर्यदत्त’च्या आठवणींना उजाळा राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांची कन्या इतिश्री या सूर्यदत्त संस्थेत शिकतानाच्या आठवणींना उजाळा दिला. इतिश्री या 2008 ते 2010 दरम्यान सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे शिकत होत्या. हा काळ इतिश्रीच्या कारकीर्द आणि व्यावसायिक जडणघडणीसाठी महत्त्वाचा होता. इतिश्रीला सूर्यदत्तमध्ये मिळालेल्या उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. इतिश्री या राष्ट्रीयकृत बॅंकेत व्यवस्थापक आहेत. मुर्मू यांचे राष्ट्रपती पदासाठी नामांकन ते शपथविधी होईपर्यंतच्या तीन आठवड्यांच्या काळात आम्हाला त्यांना दोन वेळा भेटण्याची अमूल्य संधी मिळाली. आमच्या विद्यार्थिनीच्या पालक या नात्याने आम्हाला ही संधी मिळाली. त्यांची कन्या आमच्या संस्थेत शिकली होती, याची आठवण देखील त्यांनी जपली आहे. यातून संस्थेविषयी त्यांची आपुलकी जाणवली. – डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन