Premanand Maharaj : प्रेमानंद महाराज यांची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती समोर आली असून त्यांच्या वृंदावनमधील नियमित पदयात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पूर्ण विश्रांती देण्यात आली असून भाविकांना सध्या दर्शनालाही मनाई करण्यात आली आहे. (Premanand Maharaj) मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमानंद महाराज गेल्या अनेक वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. दररोज पहाटे ३ वाजता वृंदावन येथे ते पदयात्रा करत असतात. या पदयात्रेदरम्यान देशभरातून आलेले हजारो भक्त त्यांचे दर्शन घेतात. मात्र रविवारी पहाटे महाराज पदयात्रेसाठी बाहेर आले नाहीत. त्यानंतर आश्रमातील शिष्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देत पदयात्रा रद्द झाल्याची घोषणा केली. (Premanand Maharaj) या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे महाराजांच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच आलेल्या अनेक भक्तांना दर्शन न घेताच परतावं लागलं. अनेक भाविक यावेळी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. “महाराज लवकर बरे व्हावेत,” अशी प्रार्थना करत भक्तांनी आश्रम परिसरात प्रार्थना केली. (Premanand Maharaj) सोशल मीडियावरही मोठी लोकप्रियता प्रेमानंद महाराज हे केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच नव्हे, तर सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांचे यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर लाखो फॉलोअर्स आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी त्यांचे अनुयायी मानले जातात. तसेच आशुतोष राणा, हेमा मालिनी, आणि मिका सिंग यांसारख्या नामवंत व्यक्तींनीही त्यांच्याविषयी श्रद्धा व्यक्त केली आहे. (Premanand Maharaj) दरम्यान, महाराजांची पदयात्रा आणि दर्शन पुन्हा कधी सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे देशभरातील त्यांच्या भक्तांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. (Premanand Maharaj) हेही वाचा Premanand Maharaj : संत प्रेमानंद महाराजांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी