पापाराझींना पाहून ‘प्रिती झिंटा’ घाबरली

प्रीती झिंटा लवकरच आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनणाऱ्या ‘लाहोर 1947’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सनी देओल आणि शबाना आझमी देखील दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले आहे.
View this post on Instagram
अशात काही दिवसांपूर्वी पापाराझीने प्रिती झिंटाला मुंबईतील एका ठिकाणी पाहिले. पण यादरम्यान प्रीती अचानक घाबरली आणि मागे वळली काही मिनिटांनी प्रीती झिंटाने पापाराझींसाठी पोझ दिली आणि फोटो देखील क्लिक केले. सुरुवातीला पापाराझींना बघून प्रीती घाबरली मात्र नंतर तिने आभार मानले. यावेळी प्रीतीने जिमचा आउटफिट परिधान केला होता. तिने कानात इअरफोन घातले होते. आता तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर युजर्स संमिश्र प्रतिक्रिया देत आहे.
प्रीती झिंटाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने ‘दिल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय ‘सोल्जर’, ‘कोई मिल गया’, ‘कल हो ना हो’, ‘वीर जरा’, ‘सलाम नमस्ते’ आणि ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटांमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रीती रुपेरी पडद्यापासून दूर आहे. पण आता ती सनी देओलसोबत ‘लाहोर 1974’मधून कमबॅक करणार आहे.





