Preity Zinta hits back at rumors of internal conflicts : आयपीएल २०२६ च्या सुरुवातीच्या टप्प्यात मैदानावर ‘किंग’ ठरलेला पंजाब किंग्सचा संघ सध्या पराभवाच्या गर्तेत अडकला आहे. सलग चार सामन्यांतील पराभवामुळे संघाचे समीकरण बिघडले असतानाच, आता सोशल मीडियावर संघात अंतर्गत कलह असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या अफवांमुळे संतप्त झालेल्या पंजाबच्या संघमालकीण प्रिती झिंटाने अखेर मौन सोडले असून खोटी माहिती पसरवणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. विजयाचा रथ अचानक का थांबला? यंदाच्या हंगामाची सुरुवात पंजाबने अत्यंत दिमाखात केली होती. फलंदाजीपासून क्षेत्ररक्षणापर्यंत प्रत्येक आघाडीवर संघ सरस ठरला होता. पहिल्या सात सामन्यांपैकी सहा सामने जिंकून आणि एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने पंजाबने १३ गुणांसह अनेक दिवस गुणतालिकेत अव्वल स्थान भूषवले होते. मात्र, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबची लय पूर्णपणे बिघडली. फलंदाजांचे अपयश आणि गोलंदाजांची महागडी गोलंदाजी यामुळे संघाला सलग चार पराभव पत्करावे लागले आहेत. अंतर्गत वाद आणि श्रेयस अय्यरवर नाराजी? 🗣️ Punjab Kings and Co-Owner Preity Zinta have dismissed recent reports around the team as “fake narratives”. The claims included unverified reports of Prabhsimran Singh gaining 10 kg in a few weeks, alongside stories about partying, gaming late, missing practices and… pic.twitter.com/srbCGXQWfp — TheWicketReport (@WicketReport) May 13, 2026 संघाची कामगिरी घसरताच सोशल मीडियावर पंजाबच्या खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. इतकेच नव्हे, तर कर्णधार श्रेयस अय्यरवर संघातील इतर खेळाडू नाराज असून संघात दोन गट पडल्याचे दावे काही युजर्सनी केले. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या या चर्चांमुळे संघाची प्रतिमा मलिन होत असल्याचे पाहून प्रिती झिंटाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कडक शब्दांत आपली बाजू मांडली. हेही वाचा – Sai Sudharsan Record : साई सुदर्शनचा मोठा धमाका! कोहली-गेलच्या ‘या’ खास विक्रमाशी साधली बरोबरी प्रिती झिंटाने दिले चोख प्रत्युत्तर – “टीका आणि जाणीवपूर्वक केलेली बदनामी यात मोठा फरक आहे,” अशा शब्दांत प्रितीने टीकाकारांना सुनावले. तांत्रिक मुद्द्यांवरील टीकेचे स्वागत आहे, पण खोट्या अफवा पसरवून संघाची आणि खेळाडूंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा तिने दिला आहे. केवळ खात्रीशीर माहितीच शेअर करावी, असे आवाहनही तिने यावेळी केले.