माझ्या परीसाठी प्रार्थना करा, प्लीज! शेफालीच्या नवऱ्याची अवस्था पाहवेना; का केली हात जोडून विनंती ?

Shefali Shah husband : काटा लगा गर्ल या गाण्यामुळे स्टार्डटम मिळालेली शेफाली जारीवाली हिच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. २७ जून रोजी रात्री उशिरा तिचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाल्याच्या बातम्या माध्यमांत येत आहेत.
काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, शेफालीला मेंदूशी निगडीत गंभीर आजार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे आता तिच्या मृत्येचे नेमकं कारण काय आहे याचा शोध घेतला जात आहे. शेफालीच्या अकाली निधनाने तिचा पती पराग त्यागी याच्यावर मोठा आघात झाला आहे.
दिवंगत पत्नीला अखेरचा निरोप देण्यापूर्वी त्याने तिच्या कपाळावर शेवटचे चुंबन घेतले. त्यावेळी शेफालीची आई देखील शेफालीच्या पार्थिवाशेजारी बसलेली होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसेच अभिनेत्री शेफाली जारीवालीच्या अत्यंविधीला अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. त्यानंतर मुंबईत परागने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी तो अत्यंत भावूक असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. याशिवाय त्याने पत्नीचा उल्लेख परी असा करत तिच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
काय म्हणाला पराग त्यागी?
शेफालीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून परागने तुम्ही सर्वांनी माझ्या परीसाठी प्रार्थना करा, प्लीज. असे माध्यमांसमोर हात जोडत म्हटले आहे. शेफालीच्या निधनाच्या बातमीमुळे तिचा पती पराग त्यागी खूप खचला आहे.
View this post on Instagram
नेमकं काय घडलं ?
मुंबईतील अंधेरी लोखंडवाला परिसरात राहणाऱ्या अभिनेत्री शेफालीची प्रकृती २७ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बिघडली. छातीत दुखू लागल्याने तिचा पती पराग त्यागी तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अभिनेत्री शेफालीचा मृतदेह दुपारी १२:३० वाजता अंधेरी येथील कूपर रुग्णालयात आणण्यात आला आणि नंतर पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला.
कांटा लगा या गाण्यामुळे अभिनेत्री शेफाली जारीवाला हिला फेम मिळाले. त्यानंतर तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये आणि प्रोजेक्ट्समध्येही काम केले आहे. तिथे तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. तिने वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे बिग बॉस सीझन १३ मध्ये भाग घेतला. शोमधील तिच्या वागण्याने आणि प्रेमाने प्रेक्षकांची मने जिंकली. याशिवाय शेफालीने नच बलिये सीझन ५ मध्येही भाग घेतला होता. शेफाली आजही तिच्या स्पष्टवक्त्या शैलीने आणि उत्तम नृत्याने चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.
हेही वाचा : “माझ्याजवळ येऊन बस, आपण भारताच्या प्रगतीवर चर्चा करू…”; अभिजीत बिचुकलेंच थेट एलॉन मस्कला पत्र





