Pravin Darekar : राज्यात सध्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. प्रवीण दरेकर पुढील सहकार मंत्री व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करताना पाटील यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या वक्तव्यानंतर भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून, हे विधान केवळ भाषणाच्या ओघात केले असल्याचं सांगण्यात आलं आहे. (Pravin Darekar) एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी प्रवीण दरेकर यांच्या नावामागील ‘कॅबिनेट दर्जा’ हा शब्द लवकर दूर व्हावा आणि त्यांना मंत्रीपद मिळावं, अशी शुभेच्छा दिल्या. पुढे ते सहकार मंत्री होतील, अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. यामुळे राज्यातील सहकार खात्यावर भाजपचा डोळा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावेळी त्यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख केला. अमित शहा यांच्या मार्गदर्शनामुळे आपण आधी आमदार आणि नंतर मंत्री झालो, तसेच सहकार खाते कसं मिळालं याबाबतचा किस्सा त्यांनी सांगितला. “माझ्याकडे सहकारी संस्था नसतानाही मला सहकार खाते देण्यात आलं,” असं ते म्हणाले. (Pravin Darekar) तसेच, राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोलताना पाटील यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. “राज्य कर्जबाजारी असल्याच्या टीका होत असल्या तरी परिस्थिती तशी नाही. राज्याचा जीडीपी चांगला आहे,” असं ते म्हणाले. सहकार क्षेत्रासाठी आवश्यक निधी देण्याची ग्वाही देत त्यांनी प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन केलं. (Pravin Darekar) याशिवाय, राज्यात स्वतंत्र सहकार विद्यापीठ उभारण्याचा तसेच विविध विद्यापीठांमध्ये ‘सहकार’ या विषयाचं स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.