Pratap Sarnaik : वाहन परवान्यासाठी 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा
Pratap Sarnaik : वाहन चालवण्याच्या परवान्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि शिस्तबद्ध करण्याच्या उद्देशाने आखलेल्या नवीन धोरणानुसार राज्य सरकार १ ऑगस्टपासून परवाना मिळवण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करणार आहे.

Pratap Sarnaik : वाहन चालवण्याच्या परवान्याची (ड्रायव्हिंग लायसन्स) प्रक्रिया अधिक सुलभ आणि शिस्तबद्ध करण्याच्या उद्देशाने आखलेल्या नवीन धोरणानुसार राज्य सरकार १ ऑगस्टपासून परवाना मिळवण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल सर्टिफिकेट) अनिवार्य करणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
वाहन चालवण्याच्या परवान्याशी संबंधित नवीन नियमांचा प्रस्ताव मंजुरीसाठी विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला असून, आवश्यक ती मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी (Pratap Sarnaik) सांगितले.
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान आमदार दिलीप लंडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी (Pratap Sarnaik) सांगितले की, सरकार अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरुद्ध कारवाई करत आहे. त्याच वेळी, या क्षेत्राला कायदेशीर मान्यता व नियमन करण्यासाठी तसेच राज्याचा महसूल वाढवण्यासाठी आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकार एका नियामक आराखड्यावर काम करत आहे.






