Indrajit Sawant : इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरविरोधात गुन्हा दाखल

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारी कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपनंतर प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
काय आहे प्रकरण?
प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने इंद्रजित सावंत यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल तुम्ही चुकीचे रेफरन्स दिले, असं म्हणत कोरटकर याने सावंत यांनी शिवीगाळ केली आणि धमकी दिली होती. ‘तुला घरात येऊन मारेल, हा फायनल कॉल आहे’ असं म्हणत सावंत यांना धमकी दिली होती. एवढंच नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्याबद्दल कोरटकर याने अत्यंत खालच्या शब्दांत भाष्य केले.
इंद्रजित सावंत यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात जाऊन प्रशांत कोरटकरांच्या विरोधात तक्रार दाखल केली. सावंत यांच्या तक्रारीच्या आधारे जातीय तेढ, धार्मिक भावना, महापुरुषांचा अवमान आशा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण सहा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.





