प्रशांत किशोर पश्चिम बंगालमधून राज्यसभेत ?
Updated On:

नवी दिल्ली : प्रशांत किशोर यांना तृणमूल कॉंग्रेस पश्चिम बंगालमधून राज्यसभेत पाठवण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या 5 जागा होणार रिक्त आहेत.
तृणमूल कॉंग्रेसचे नेतृत्व पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत नवीन चेहर्यांना संधीदेण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार चार जागांवर उमेदवारांची निवड जवळपास निश्चित करण्यात आली आहे. पाचव्या जागेबाबत पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.
विधानसभेच्या जागा वाटपाच्या दृष्टीने तृणमूलला राज्यसभेत चार जागा मिळतील, परंतु पाचवी जागा कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या या जागेवर जोगन चौधरी, मनीष गुप्ता, अहमद हसन इमरान आणि के. डी. सिंह हे चारही खासदार तृणमूलचे आहेत.





