प्रशांत किशोर यांना रॅलीदरम्यान दुखापत; भाषण न देताच रुग्णालयात केले दाखल

Prashant Kishor Injured | बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. या शर्यतीत प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष देखील मैदानात उतरला आहे. प्रशांत किशोर हे देखील जनतेपर्यंत पोहचण्यासाठी बिहारमध्ये पदयात्रा, रॅली करत आहेत. मात्र याचदरम्यान एक दुर्घटना घडली आहे.
जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांना आरा येथील बिहार बदलाव सभेत दुखापत झाली आहे. रॅलीदरम्यान प्रशांत किशोर यांना छातीच्या बरगडीला दुखापत झाली. त्यानंतर प्रशांत किशोर भाषण न देताच उपचारासाठी पाटणा येथे परतले आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आरा येथे झालेल्या सभेदरम्यान जनतेशी संवाद साधण्यासाठी ते गाडीतून रॅली करताना लटकत होते. यावेळी खूप गर्दी होती आणि प्रशांत किशोर यांना गर्दीचा धक्का लागला. यात गाडीचा दरवाजा त्यांच्या छातीवर आदळला आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर त्यांना आरा येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर प्रशांत किशोर यांना पाटणा येथे हलवण्यात आले असून, तेथील रुग्णालयात सध्या त्यांचावर उपचार सुरु आहेत. Prashant Kishor Injured |
दरम्यान, प्रशांत किशोर आपल्या भाषणांमधून सातत्याने भाजप आणि मुख्यमंत्री नितीशकुमारांवर टीका करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांनी माजी भाजप खासदार उदय सिंह यांना आपल्या जनसुराज पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले आहे. Prashant Kishor Injured |
हेही वाचा:





