Prasar Bharati | आता प्रसार भारतीचेही ओटीटी प्लॅटफॉर्म, 65 लाइव्ह चॅनेलसह अनेक सुविधा असणार उपलब्ध…

पणजी – सध्या सर्वत्र ओटीटी प्लॅटफॉर्म लोकप्रिय आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म हे लोकांसाठी एक महत्वपूर्ण मनोरंजनाचे साधन आहे. दरम्यान, या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करण्यासाठी प्रसार भारतीने स्वतःचे ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. प्रसार भारतीने 55 व्या ईफी अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. या प्लॅटफॉर्मचे नाव वेव्ह्स आहे. यामध्ये 65 लाईव्ह चॅनेलसह अनेक सुविधा असणार आहे.
प्रसार भारतीने आपल्या एक्स खात्यावर पोस्ट करून ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यासंदर्भात माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये प्रसार भारतीने म्हटले आहे की, क्लासिक सामग्री आणि समकालीन प्रोग्रामिंगचे समृद्ध मिश्रण ऑफर करून प्रगत डिजिटल ट्रेंड स्वीकारताना नॉस्टॅल्जिया रिफ्रेश करणे हे या प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट आहे. या ओटीटीसाठी कोणतेही सबस्क्रिप्शन शुल्क नाही
प्रसार भारतीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ, फ्री-टू-प्ले गेमिंग, रेडिओ ऑनलाइन स्ट्रीमिंग, लाइव्ह टीव्ही स्ट्रीमिंग, 65 लाइव्ह चॅनेल, व्हिडिओ आणि गेमिंग सामग्री असेल. या सुविधा 12 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध असतील.
Photos : भारत की ऑस्ट्रेलिया..! जाणून घ्या, कोण आहे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा खरा किंग…?
दरम्यान, ओटीटीवर जीओ सिनेमा, प्राईम व्हीडिओ, व्हॉटस्टार, झी-5 आणि सोनी लाइव्ह सारखे प्लॅटफॉर्म आहेत. या प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारची सामग्री उपलब्ध आहे. अलीकडे जीओ सिनेमा आणि हॉटस्टार एकत्र विलीन होऊन जीओस्टार. कॉम बनले आहेत. आता प्रसार भारतीच्या वेव्ह्सची एन्ट्री झाल्यानंतर या ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये स्पर्धा वाढणार आहे.


