Marathi Movie: ‘माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नका…’, प्रसाद ओक, स्वप्निल जोशीच्या ‘जिलबी’चा जबरदस्त टिझर रिलीज

Marathi Movie Jalebi Teaser: अभिनेता स्वप्निल जोशी आणि प्रसाद ओक यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘जिलबी’ या चित्रपटाचा टिझर समोर आला आहे. या चित्रपटात स्वप्निल जोशी आणि प्रसाद ओक हे दोन्ही कलाकार एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर समोर आले होते. या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ‘जिलबी’ हा चित्रपट 17 जानेवारी 2025 ला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल.
चित्रपटाचा टिझर समोर आल्यापासून सोशल मीडियावर याची चर्चा सुरू झाली आहे. या टिझरमध्ये ‘मला ना गोल गोल फिरवता येत नाही’ मी डायरेक्ट पॉईंट वर येतो. ‘एकदा सुरू झालं ना.. की मुळासकट सगळं बाहेर निघेल..!, असे दमदार डायलॉग पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात स्वप्नील जोशी विजय करमरकर या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.
View this post on Instagram
हा चित्रपट 17 जानेवारी 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे. तर निर्माते आनंद पंडित आणि रूपा पंडित हे आहेत.
चित्रपटामध्ये स्वप्निल जोशी आणि प्रसाद ओक यांच्यासोबतच शिवानी सुर्वे, पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत.





