Bigg Boss 19 Pranit More | बिग बॉस’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये नेहमीच वाद आणि मनोरंजक प्रसंग घडत राहतात. यंदाच्या ‘बिग बॉस १९’ मध्ये प्रसिद्ध कॉमेडीयन प्रणित मोरे देखील सहभागी झाला असून त्याला अनेक मराठी सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळत आहे. अलीकडेच घरातील स्पर्धक प्रणित मोरे आणि बसीर अली यांच्यात एक वाद झाला, जो प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. या वादादरम्यान प्रणितवर वैयक्तिक टीका करण्यात आली होती. यादरम्यान, बहुतांश इन्फ्लुएन्सर्सनी प्रणितला पाठिंबा देत बसीर अलीवर टीका केली होती. अगदी शोमध्ये सहभागी होणाऱ्या गौहर खानसारख्या पाहुण्यांनी सुद्धा प्रणितचं कौतुक केलं. मात्र, हे सगळं असूनही गेल्या वीकेंड त्याला स्क्रीन टाइम मिळाला नाही असा दावा त्याच्या चाहत्यांकडून करण्यात येत होता. आता अंकिता वालावलकरने सुद्धा याबाबत भाष्य केलं आहे. Bigg Boss 19 Pranit More | ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर पोस्टमध्ये लिहिते, “पहिल्या आठवड्यात, सगळे मराठी प्रेक्षक प्रणितच्या समर्थनात बोलत होते. गेल्या आठवड्यात सुद्धा त्याला प्रेक्षकांचा पाठिंबा होता. पण, ‘वीकेंडच्या वार’ला प्रणितला झिरो स्क्रीन टाइम देण्यात आला. म्हणजे तो अजिबातच स्क्रीनवर दिसत नव्हता. या आठवड्यात सुद्धा त्याला कमीत कमी दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर मग तू काहीच करत नाही असं बोलून त्याला बाहेर काढतील. हा सगळा एडिटिंगचा खेळ मलाही माहीत आहे. त्यामुळे… व्होट फॉर प्रणित! जय महाराष्ट्र.” Bigg Boss 19 Pranit More | अंकिताच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकजण प्रणितच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. यापूर्वी ‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवारनेही प्रणितला व्होट करण्याचे आवाहन प्रेक्षकांना केलं होतं. Bigg Boss 19 Pranit More | हेही वाचा: पुन्हा नवी मुंबई विमानतळावरून राजकारण तापलं! भाजपचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, काँग्रेसचाही घेतला समाचार