Prajakta Mali : प्राजक्ता माळीने पुन्हा एकदा निर्मितीची धुरा सांभाळणार; नव्या सिनेमाचे पोस्टर रिलीज
Prajakta Mali : आदिनाथ कोठारे 'गौरी' या मराठी चित्रपटाचे करणार दिग्दर्शन

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने मालिकांसह मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. नुकतेच तिने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. ‘फुलवंती’ सिनेमानंतर प्राजक्ता माळीची निर्मिती असलेला नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दसऱ्याचा मुहूर्त साधत तिने नव्या सिनेमाचे पहिलं पोस्टर ही शेअर केले आहे.
प्राजक्ता माळी या चित्रपटात ‘गौरी’ची मध्यवर्ती भूमिका साकारणार असून, निर्माती म्हणूनही ती या चित्रपटाची धुरा सांभाळत आहे. प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, “कारण काही लढायांसाठी स्त्रीच लागते. विजयादशमी. 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा निर्मातीच्या भूमिकेत.
View this post on Instagram
सोबतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेले निर्माते राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक आदिनाथ कोठारे आणि राज्य पुरस्कार विजेता लेखक प्रताप फड असल्याने या निर्मितीच्या कळा सुसह्य असणार आहेत. यापेक्षा जास्त काही मागू शकत नाही. खूप कृतज्ञ आहे. 2024 च्या नवमीला ‘फुलवंती’ प्रदर्शित झाली होती. 2026 च्या दशमीला ‘गौरी’ जाहीर करतेय.”
पोस्टरमध्ये प्राजक्ता ‘गौरी’च्या भूमिकेत दिसत आहे. ‘गौरी’ हा केवळ एका स्त्रीच्या आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्याभोवती फिरणारा चित्रपट नाही, तर न्यायासाठी एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीच्या बाजूने उभे राहाण्याची गरज असून काही वेळेला एक स्त्रीच न्याय मिळवून देऊ शकते, हा विचार मांडणारा आहे.
विशेष म्हणजे ‘पाणी’ या चित्रपटातून दिग्दर्शनाची वेगळी छाप उमटवणारा आदिनाथ कोठारे ‘गौरी’ या मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या कथानकाविषयी आणि इतर कलाकारांविषयीची माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ‘गौरी’च्या माध्यमातून कोणती कथा मांडली जाणार याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा:
Elon Musk: एलॉन मस्क यांचा युक्रेनला मोठा धक्का ; स्टारलिंकचा वेग मंदावला, कीववर अंधाराचे संकट





