प्राजक्ता माळीने फार्महाऊस घेण्यामागचे सांगितले कारण; म्हणाली “मला एवढं…”

Entertainment – अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) सिने क्षेत्रासह व्यावसायिक क्षेत्रात देखील पाऊल ठेवले आहे. मागील वर्षी तिने ‘प्राजक्तराज’ (Prajaktaraj) नावाचा ज्वेलरी ब्रँड लाँच केला. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने तिचं नवं फार्म हाऊस खरेदी केले. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली होती. प्राजक्ताने या फार्महाऊसला ‘प्राजक्तकुंज’ असे नाव दिले आहे.
कर्जतमध्ये डोंगराच्या कुशीत प्राजक्ताचे हे फार्महाऊस (Farmhouse) आहे. काही दिवसांपूर्वीच तिने या फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा केला होता. निसर्गाच्या सानिध्यात असलेले प्राजक्ताचे फार्म हाऊस प्रशस्त आहे. मात्र एका मुलाखतीत प्राजक्ताने हे फार्महाऊस खरेदी करण्यामागचं कारण सांगितले आहे. प्राजक्ता म्हणाली, “मला निसर्गात राहायला खूप जास्त आवडतं. मी संपूर्ण दिवस झाडाखाली काढू शकते. यामुळे मी फार्महाऊस घेण्याचा निर्णय घेतला.”
पुढे ती म्हणाली, “मला एवढं मोठं फार्महाऊस घ्यायच नव्हते. माझं तेवढं बजेटही नव्हतं. पण ते घर बघितल्यानंतर मी त्याच्या प्रेमात पडले. कारण जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त हिरवळंच दिसते. घराच्या मागे डोंगर, धबधबे आणि झरे आहेत. तिथे फक्त पाण्यांचा आवाज येतो. शेवटी मी विचार केला सगळं गेलं तेल लावत. एखादी गोष्ट आवडली तर रुखरुख करुन जगण्यात काय अर्थ आहे.”
प्राजक्ताची पोस्ट –
View this post on Instagram
दरम्यान, प्राजक्ताने हे फार्महाऊस खरेदी करण्यासाठी कर्ज काढले आहे. इनस्टाग्रामवरील पोस्टच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली होती. प्राजक्तानं 14 जुलै 2023 रोजी नव्या फार्महाऊसचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. “स्वप्न साकार. माझ्या स्वप्नातील फार्महाऊसची हक्काची मालकीण. डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे, एवढीच अट होती. अगदी मनासारखं घर मिळालं. नाव असणार आहे- “प्राजक्तकुंज”. खानदानातली सर्वात सुंदर प्रॉपर्टी, खानदानातल्या सर्वात मोठ्या कर्जासहीत. फेडू, फक्त तुमचा आशिर्वाद राहू द्या.” तिच्या या पोस्टनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला होता.





