Prajakta Mali: प्राजक्ता माळीची मुंबईत मोठी गुंतवणूक! २८व्या मजल्यावर घेतलं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं आलिशान घर
Prajakta Mali मालमत्ता नोंदणीशी संबंधित कागदपत्रांनुसार, प्राजक्ताने १२ ऑगस्ट २०२६ रोजी या घराच्या व्यवहाराची नोंद केली. हा फ्लॅट इमारतीच्या २८व्या मजल्यावर असून त्याचे कार्पेट एरिया सुमारे ९९६ चौरस फूट आहे. या घरासोबत २४० चौरस फुटांची टँडम कार पार्किंगची जागाही मिळाली आहे.

Prajakta Mali: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. प्राजक्ताने मुंबईत तब्बल ६.४२ कोटी रुपयांचा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातील प्रसिद्ध ओबेरॉय एक्सक्युझिट या प्रोजेक्टमध्ये तिने हा फ्लॅट घेतला आहे.
मालमत्ता नोंदणीशी संबंधित कागदपत्रांनुसार, प्राजक्ताने १२ ऑगस्ट २०२६ रोजी या घराच्या व्यवहाराची नोंद केली. हा फ्लॅट इमारतीच्या २८व्या मजल्यावर असून त्याचे कार्पेट एरिया सुमारे ९९६ चौरस फूट आहे. या घरासोबत २४० चौरस फुटांची टँडम कार पार्किंगची जागाही मिळाली आहे.
फ्लॅटची किंमत ६.४२ कोटी
प्राजक्ता माळीने हा फ्लॅट नूर खान आणि युसूफ अली खान यांच्याकडून खरेदी केल्याची माहिती मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांमधून समोर आली आहे. या फ्लॅटची एकूण किंमत ६.४२ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
या व्यवहारासाठी प्राजक्ताने तब्बल ३२.१२ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. याशिवाय ३० हजार रुपये नोंदणी शुल्कही भरावे लागले आहे. त्यामुळे घराच्या किमतीसोबतच या व्यवहारासाठीचा अतिरिक्त खर्चही मोठा आहे.
५.७८ कोटी रुपयांचे होम लोन
प्राजक्ताने या आलिशान घरासाठी मोठ्या प्रमाणात होम लोन घेतल्याची माहितीही समोर आली आहे. ६.४२ कोटी रुपयांच्या फ्लॅटसाठी तिने इंडियन बँकेकडून ५.७८ कोटी रुपयांचे होम लोन घेतले आहे. हे कर्ज २८ जुलै २०२६ रोजी मंजूर झाल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद आहे.
म्हणजेच फ्लॅटच्या एकूण किमतीपैकी जवळपास ९० टक्के रक्कम होम लोनच्या माध्यमातून देण्यात आली आहे. उर्वरित रक्कम आणि व्यवहाराशी संबंधित इतर खर्च प्राजक्ताने स्वतः केला आहे.

Prajakta Mali
मुंबईत प्राजक्ताचं दुसरं घर
प्राजक्ता माळीने मुंबईत याआधीही घर खरेदी केल्याची माहिती आहे. त्यामुळे ही तिची मुंबईतील दुसरी मोठी घरखरेदी असल्याचे वृत्त आहे. अभिनय, सूत्रसंचालन आणि इतर कामांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या प्राजक्ताने आता मुंबईतील प्रीमियम प्रॉपर्टीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
या सोसायटीत अमिताभ बच्चन यांचीही होती गुंतवणूक
प्राजक्ताने ज्या ओबेरॉय एक्सक्युझिटमध्ये घर घेतले आहे, त्या प्रोजेक्टमध्ये यापूर्वी अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही गुंतवणूक केली होती. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी या सोसायटीमध्ये दोन फ्लॅट खरेदी केले होते.
ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये अमिताभ बच्चन यांनी हे दोन्ही फ्लॅट प्रत्येकी ६ कोटी रुपये, म्हणजेच एकूण १२ कोटी रुपयांना विकले. त्यांनी हे फ्लॅट २०१२ मध्ये एकूण ८.१२ कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यामुळे सुमारे १३ वर्षांमध्ये त्यांच्या गुंतवणुकीवर ४७ टक्के नफा झाल्याचे सांगितले जाते.
रणवीर सिंहनेही केली होती गुंतवणूक
अभिनेता रणवीर सिंहनेही याच सोसायटीमध्ये दोन फ्लॅट खरेदी केले होते. २०१४ मध्ये त्याने हे फ्लॅट प्रत्येकी ४.६४ कोटी रुपयांना घेतले होते. २०२३ मध्ये त्याने दोन्ही फ्लॅट एकत्रितपणे १५.२४ कोटी रुपयांना विकल्याची माहिती आहे.
त्यामुळे आता प्राजक्ता माळीची ६.४२ कोटी रुपयांची घरखरेदी चर्चेचा विषय ठरली आहे. २८व्या मजल्यावरील आलिशान घर, मोठी कार पार्किंग आणि कोट्यवधींची गुंतवणूक यामुळे प्राजक्ताच्या या नव्या प्रॉपर्टीची सध्या मनोरंजन विश्वात चर्चा रंगली आहे.





