वाघोलीकरांच्या रस्त्यांना प्रदीप कंदांचा हातभार; माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांची माहिती

वाघोली : वाघोली तालुका हवेली येथील जवळपास 13 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजूरी मिळवण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मोलाचे योगदान दिलेले असतानाच वाघोली मधील अनेक भागातील रस्त्यांची दुरुस्ती करून पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी हातभार लावत सामाजिक बांधिलकीचा आदर्श उभा केला. वाघोलीकरांनी या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले आहे.
वाघोली मधील गणेशनगर भागातील साईराज पार्क, एंकाई सोसायटी, समर्थ पार्क त्यासोबतच केसनंद रोड वरील बालाजी विहार, दुबेनगर, गुरुदत्त पार्क सोसायटी या परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली होती. या परिसरातील रहिवाशी व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. रस्त्याची ही वाईट अवस्था लक्षात घेत सामाजिक कर्तव्य समजत या भागातील सुमारे ५ किमी रस्त्यांवर मुरूम टाकून रोलिंग करत रस्ता दुरुस्त प्रदीप कंद यांनी पुढाकार घेऊन दुरुस्त करून दिला आहे.
कंद यांनी या कामाची सहकाऱ्यांसह पाहणी केली. या भागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान आनंद देणारे असल्याचे कंद यांनी सांगितले आहे. याप्रसंगी मा. जि. प. सदस्य रामभाऊ दाभाडे, क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीप भोंडवे, भाजपा तालुकाध्यक्ष शामराव गावडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव, उद्योजक संतोष देशमुख व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
वाघोली मधील विकास कामांसाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार राहुल कुल, प्रदीप कंद यांच्या माध्यमातून मोलाची मदत होत असून यापुढील काळात देखील जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून विकास कामे करण्यावर भर दिला जाणार आहे.
रामभाऊ दाभाडे
(माजी सदस्य, जिल्हा परिषद पुणे)





