प्रभात इम्पॅक्ट : इंद्रायणी कॉलनीतील पथदिवे सुरू, नागरिकांना दिलासा
Kamshet : इंद्रायणी कॉलनीतील रात्रीची प्रकाश व्यवस्था सुरळीत

कामशेत – इंद्रायणी कॉलनीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागत असल्याचे वृत्त दैनिक प्रभातने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेत बंद पथदिव्यांची पाहणी करून त्यांची दुरुस्ती केली.
इंद्रायणी कॉलनीच्या मुख्य प्रवेशमार्गावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना अंधारातून ये-जा करावी लागत होती. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पथदिवे दुरुस्त करण्यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या.
मात्र कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी प्रभातने ही समस्या मांडली. वृत्त प्रसिद्ध होताच ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ कार्यवाही केली. पथदिव्यांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात आली.
त्यानंतर पथदिवे पुन्हा सुरू झाले असून, इंद्रायणी कॉलनीतील रात्रीची प्रकाश व्यवस्था सुरळीत झाली आहे. दरम्यान प्रभात इम्पॅक्टमुळे समस्या तातडीने मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
Bombay Clay: पीओपीला पर्याय; पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बॉम्बे क्ले’च्या बाप्पाची क्रेझ





