मुंबई – आदिपुरुष या चित्रपटात क्रिती सेनॉन आणि प्रभास ही सुंदर जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे. दोघेही एकत्र छान दिसतात. आदिपुरुषच्या ट्रेलरच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये प्रभाससोबत क्रिती सेननला पाहून पुन्हा एकदा त्यांच्या नात्याच्या बातम्या चर्चेत आल्या.
आदिपुरुषचा राम प्रभास त्याची लीडिंग लेडी क्रिती सेनॉनचा हात धरून स्क्रिनिंगला पोहोचला. दोघांचा या दरम्यानचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी या व्हिडिओचे कौतुक केले आहे. तसेच ‘जोडी नंबर वन’ अशी कंमेंस्ट्स केली आहे. दोघांची जोडी खूप सुंदर दिसत होती. प्रभास पांढऱ्या कुर्त्यात दिसला, तर क्रिती सेनॉनच्या पिस्ता रंगाच्या लेहेंग्यात भारीच दिसत होती.
क्रिती सेननने तिचा ड्रेस अतिशय सुंदर स्टाईलमध्ये कॅरी केला होता. क्रिती सेनन साऊथचा सुपरस्टार प्रभासला डेट करत असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून बी-टाऊनमध्ये चर्चेत आहे. दोघेही त्यांच्या नात्याबाबत सिरीयस आहेत. आता चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच या बातम्यांना पुन्हा एकदा उधाण येऊ लागले आहे.
आदिपुरुष या चित्रपटात क्रिती सेननने सीता मातेची भूमिका साकारली असून नुकतेच क्रिती सेन या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स शेअर केले आहेत आज आदिपुरुषचा ट्रेलर लाँच होणार आहे, ज्याची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.