Entertainment | साऊथचा ‘रिबेल स्टार’ प्रभास त्याच्या ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटानंतर त्याच्या अपकमिंग चित्रपटाचीही चर्चा चांगलीच होत आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सजल अलीसोबत तो पुढील चित्रपटात काम करणार असल्याचे बोलले जात आहे. प्रभाससोबत बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. असल्याची चर्चा आहे. रिपोर्टनुसार, आघाडीचे तेलुगू प्रोडक्शन हाऊस त्यांच्या रोमांटिक ड्रामा चित्रपटात प्रभास आणि सजल अलीला कास्ट करणार असल्याची चर्चा आहे. लाहोरमध्ये जन्मलेली सजल अली ही पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती एक मॉडेल देखील आहे. सजल टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती त्या देशातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री देखील आहे. तिने 2009 मध्ये ‘नादानियां’ या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, मात्र 2013 मध्ये ‘नन्ही’ या मालिकेने तिला ओळख मिळाली. श्रीदेवीच्या ‘मॉम’ चित्रपटातही काम केले. हा क्राईम-थ्रिलर चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. सजल अली आर्या सब्रवालच्या भूमिकेत दिसली होती. प्रभास आणि सजल एकत्र दिसणार असल्याच्या चर्चांवर प्रोडक्शन हाऊसने कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, प्रभास नाग अश्विनच्या ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात दिसला होता, ज्यात दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटाने जगभरात 1000 कोटींचा गल्ला जमवला आहे. याआधी त्याच्या ‘सालार’ या चित्रपटानेही भरघोस कमाई केली होती. आता प्रभास पुढील हॉरर कॉमेडी चित्रपट ‘द राजा साब’मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती संदीप वंगा रेड्डी यांच्या ‘स्पिरिट’ चित्रपटातही आहे.