Manchar : बटाटा काढणी सुरू; प्रतिक्विंटल ३०० रुपये दर
Manchar ; उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश आणि पंजाब या प्रमुख बटाटा उत्पादक राज्यांमध्ये नवीन बटाट्याची काढणी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील बटाट्याला बाजारपेठेत मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर परराज्यांतील व्यापारी आंबेगाव तालुक्यात खरेदीसाठी येत आहेत.

Manchar : आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे ऑगस्ट महिन्यात लागवड केलेल्या बटाटा पिकाची काढणी सुरू झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकाच्या उत्पादनासाठी शेतकर्यांना अधिक खर्च करावा लागला आहे. मशागतीपासून पाणी व्यवस्थापनापर्यंतचा खर्च वाढल्याने उत्पादक अडचणीत असतानाच, सध्या बटाट्याला प्रतिक्विंटल 300 रुपये दर मिळत आहे. परराज्यांतील व्यापारीही शेतकर्यांच्या बांधावर खरेदीसाठी दाखल झाल्याने उत्पादकांना विक्रीची संधी उपलब्ध झाली आहे.
उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश आणि पंजाब या प्रमुख बटाटा उत्पादक राज्यांमध्ये नवीन बटाट्याची काढणी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील बटाट्याला बाजारपेठेत मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर परराज्यांतील व्यापारी आंबेगाव तालुक्यात खरेदीसाठी येत आहेत. मात्र, पावसाअभावी बटाट्याची अपेक्षित वाढ आणि फुगवण झाली नसल्याचे दिसून येत आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर समाधानकारक असणे आवश्यक आहे, असे निरगुडसर येथील शेतकरी बाबाजी नथू ढोबळे यांनी सांगितले.
यंदा पाऊस कमी झाल्याने बटाटा पिकासाठी एकरी खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे उत्पादन खर्च भरून निघण्यास मदत होईल. बाजारभाव टिकून राहिल्यास शेतकर्यांना चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे.
-मंगेश टेमगिरे, शेतकरी, थोरांदळेशेतकर्यांनी पूर्ण वाढ झालेला आणि चांगल्या प्रतीचा बटाटा काढावा. त्याची योग्य प्रतवारी करून आकारानुसार वर्गीकरण करावे. दर्जेदार माल बाजारात आणल्यास ग्राहकांचा विश्वास वाढण्यासह बाजारभाव टिकून राहण्यास मदत होईल.
-मयूर चिखले, व्यापारी, के. एफ. पोटॅटो ट्रेडर्स





