बारामतीत पोस्टरबाजी करणे पडणार महागात….

बारामती (प्रतिनिधी) | नगरपरिषदेची परवानगी न घेता पोस्टरबाजी करणे आता महागात पडणार आहे. परवानगी न घेता पोस्टर लावले तर पोस्टर लावणारा वरती व ज्याच्या साठी लावले आहेत. त्याच्यावर ती देखील महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा कलम तीन प्रमाणे पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नागरिकांनी परवानगी न घेता पोस्टर चिटकवून नयेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.
बारामती शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे सुरू आहेत. शहराचे सुशोभिकरण होत आहे. परंतु अनेक जाहिरातदार तसेच काही व्यक्ती रस्त्याच्या कडेला पोलला पुलाच्या कठड्याला व बांधकामाच्या कॉंक्रीटला रस्त्याच्या इलेक्ट्रिक पोलला पोस्टर चिकटवत असल्याचे दिसून येत आहे.
पोस्टर चिकटवल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. सदर पोस्टर लावताना कोणाचीही परवानगी घेतलेली नसते. असे अनेक पोस्टर निदर्शनास आल्यानंतर बारामती शहर पोलिसांनी त्यांना बोलून घेऊन सदर पोस्टर आज संध्याकाळपर्यंत काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. काहींनी ते काढण्यास सुरुवात केली आहे.
यापुढे असे पोस्टर कोणी लावल्यास महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा कलम तीन प्रमाणे पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल. तरी यापुढे कोणीहीया प्रकारे पोस्टर नगरपालिका हद्दीमध्ये लावू नयेत. लावायचे असेल तर त्याची रीतसर परवानगी नगरपालिकेकडून घ्यावी. अन्यथा लावणारे छापणारे व ज्यांच्या साठी लावलेले आहेत, त्या सर्वांच्या वर गुन्हा दाखल होणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक महाडिक यांनी दिला आहे.





